मुंबई : केळीचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. नाश्त्यामध्ये केळी खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. मात्र केळीची साल जी आपण फेकून देतो त्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचा उजळण्यासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. केळ्याची सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर रगडा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील. 


२. केळ्याच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने डाग दूर होतात. तसेच त्वचेमध्ये चमक येते. 


३. केळ्याच्या सालीमधील सफेद धागे काढून  त्याल अॅलोव्हेरा जेल मिसळा. याने डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतील. 


४. केळ्याची साल चामखीळवर रगडल्याने ते दबून जातात.