पाल चावल्यानंतर `5` घरगुती उपाय
उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या घरात पाल दिसली नसेल असे क्वचितच घडले असेल.
मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या घरात पाल दिसली नसेल असे क्वचितच घडले असेल. खरंतर पाल कधीही आणि कुठेही दिसू शकते. पाल चावल्यास वेळीच उपचार करणं आवश्यक आहे. पाल विषारी असते किंवा नसते यावर अनेक वेगवेगळी मतं आहेत, पण अनेकवेळा आपण खाद्यपदार्थ पालीच्या भीतीने उघडे ठेवत नाहीत, आणि तीच पाल चावल्यावर, आपण घारबरतो, पण घाबरण्याची काहीही गरज नाही. म्हणूनच काही घरगुती उपाय नक्की करायलाच हवेत.पालीला घराबाहेर ठेवण्यासाठी मदत करतील घरातील हे '5' पदार्थ
गरम पाणी
पाल चावल्यानंतर तो भाग तात्काळ गरम ( सोसवेल इतक्या) बुडवा. किमान 20 मिनिटं गरम पाण्यात तो भाग राहिल्याने इंफेक्शन पसरण्याचा धोका कमी होतो.
अॅन्टिबायोटिक क्रीम
पाल चावल्यानंतर त्या भागावर कापसाच्या बोळ्यावर अॅन्टिसेप्टिक लोशन लावून स्वच्छ करा. त्यानंतर अॅन्टिबायोटिक क्रीम लावा.
बर्फ लावा -
पाल चावल्यानंतर त्याजागी सूज आल्यास तात्काळ बर्फाचा शेक द्यावा. थेट जखमेवर बर्फ लावू नका. जखमेच्या आसपासच्या भागावर बर्फ लावा.
हळद -
हळदीमध्ये अॅन्टीबायोटिक गुणधर्म असल्याने कोणत्याही जखमेवर हळद फायदेशीर ठरते. तेलात हळद मिसळून लावल्याने रक्तात संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो.
पालीचा दात काढा -
पालीचे दात अत्यंत लहान असतात. चावल्यानंतर अनेकदा ते जखमेमध्येच राहू शकतात. तुम्हांला दात दिसल्यास तो तात्काळ काढून टाका.