Food For Sexual Wellness: लैंगिक समस्या दूर करण्यासाठी `या` पदार्थाचे सेवन ठरेल फायदेशीर?
Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे.
Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण यासाठी आपल्या आहारातही बदल करू घेतो. पण आता आम्ही तुम्हाला अशा पदार्थाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या लैंगिक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. हे एकप्रकारचं ड्रायफ्रुट आहे. त्या पदार्थांचं नावं आहे मुनक्का किंवा मनूका. हे एक अतिशय आरोगदायी ड्रायफ्रुट (Dryfruit) आहे. ज्यामुळे तुमचे हृदय चांगले राहते. त्याचसोबतच हाडंही मजबूत होतात. (Food For Sexual Wellness health news this dry fruit can boost immunity)
म्हणूनच कोरडी द्राक्षे ही नुसती किंवा दुधात घालून आपण खाऊ शकतो. मनुका खाल्ल्यानं शरीरात इम्यूनिटी (Immunity) वाढते. त्याचसोबत रक्ताची कमतरताही कमी होते. तेव्हा एकपेक्षाही अनेक फायदे असणाऱ्या मनुकांचा फायदा आपल्या लैंगिक समस्या सुधारण्यासाठीही होऊ शकतो. तेव्हा जाणून घेऊया मनुक्यांचे फायदे काय आहेत?
काय आहेत फायदे?
असं म्हटलं जाते की रोज दुधात बेदाणे मिसळून सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होऊ शकते. मनुका हे लैंगिक दुर्बलता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
बेदाण्यांमध्ये अर्जिनन नावाचे आम्ल असते जे लैंगिक शक्ती आणि उत्तेजना वाढवण्यास मदत करते. असं म्हणतात जे पुरूष इरेक्टाइल डिसफंक्शनच्या समस्येनं ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी मनुका फायदेशीर आहेत. म्हणूनच केशर आणि मनुका मिश्रित दूध लग्नाची पहिल्या रात्री देण्याची प्रथा आहे.
पुरूषांनी मध आणि मनुका एकत्र खाल्ल्यानं लैंगिक क्षमता वाढण्यास मदत होते.
पुरूषांनी दररोज मध आणि मनुका खाल्लानं शुक्राणूंचीही संख्या वाढते.
मनुका खाल्ल्यानं स्नायूंंमधील ताकदही वाढते.
मनुकांंमुळे दृष्टी सुधारते तसेच कर्करोगापासूनही बचाव होतो.
मध आणि मनुक्यांमधल्या ग्लुकोज, पोटॅशियम आणि आयर्न मुळे ताकद वाढते. ज्यानं लैंगिक समस्या दूर होते आणि स्पर्म कॉलिटीही सुधारते.
इतर फायदे
मनुका एसिडिटी दूर करताता तसेच रक्तदाबही मनुका खाल्ल्यानं सुधारतो. त्याचबरोबर मनुका या भिजवूनही खाव्यात कारण त्यात आवश्यक ती पोषक घटकं असतात. मनुक्यांमध्ये एन्टी-ऑक्सिडंट्सही असतात. अर्धा कप मनुका मध्ये 45 मिलीग्राम कॅल्शियम (Calcium) असते. त्यामुळे मनुका खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. रोज सकाळी मनुक्यांचे सेवन तुमच्या शरीराला नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)