मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना सुट्ट्या असतात, अनेकजण सहलींचं प्लॅनिंग करतात तर हाच काळ लग्नमौसमांचा असतो. उन्हाळ्यात प्रखर झालेलं उन तुमची भूक मंदावण्याचं कारणं असतं पण एन्जॉयमेंटच्या आनंदात अनेकदा चटपटीत आणि बाहेरचे पदार्थ खाण्याकडे तुमचा ओढा असल्यास आरोग्य बिघडू शकते. उन्हाळ्याच्या दिवसात संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे. या दिवसात डीहायड्रेशनचा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच आहारात कोणते पदार्थ टाळावेत याबाबतही सतर्क राहणं आवश्यक आहे. 


आईस्क्रिम सॅन्डव्हिच - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईस्क्रिम आणि उन्हाळा हे अतुट नातं आहे. या दिवसामध्ये तुम्ही 'कूल' राहण्यासाठी घरच्या घरी आईस्क्रिम बनवू शकता. किंवा आईस्क्रिम सॅन्डव्हिचची तयारीदेखील घरी करू शकता. मात्र बाजारातील विकतचे आईस्क्रिम सॅन्डव्हिच टाळा. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स अधिक असतात. 


तिखट जेवण - 


तिखटाचे जेवण उन्हाळ्यात टाळावे. यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. मसाल्याच्या पदार्थांमुळे शरीरात मेटॅबॉलिझम वाढते. 


मांसाहार - 


जड  मांसाहार उन्हाळ्याच्या दिवसात टाळावा. मंदावलेल्या पचनसंस्थेच्या कार्यामुळे पचन न झाल्यास डायरियाचा त्रास बळावू शकतो.  उन्हाळ्यात मांसाहार जपूनच करावा. 


तेलकट पदार्थ -  


बर्गर, मीट पॅटीस, फ्राईज यासारखे तेलकट पदार्थ आहारात टाळावेत. 


खारट स्नॅक- 


खारट स्नॅक्सच्या पदार्थांमध्ये MSG घटक आढळतो. यामुळे भूक आणि वजनही वाढण्याचा धोका असतो. 


शिळे पदार्थ - 


वारंवार गरम केलेले किंवा नेहमीच शिळे पदार्थ खाणं टाळा. उन्हाळ्यात पदार्थ खराब होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पचनाशी निगडीत काही आजार बळावण्याची शक्यता असते.