Flaxseed And Cinnamon For High Cholesterol: आजच्या धावपळीच्या युगात आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्याचवेळी अवेळी खाणेही आरोग्यासाठी हानीकारक ठरत आहे. आता उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या वाढताना दिसून येत आहे. वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करणे खूप आवश्यक आहे, अन्यथा यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे कोलेस्ट्रोल कमी करण्याची गरज असते. High Cholesterol कमी करण्यासाठी 2 सोपे उपाय जाणून घ्या आणि त्यातून तुमची सुटका करा.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या युगात कोलेस्ट्रॉल ही एक मोठी समस्या बनली आहे, सर्व वयोगटातील लोक त्याला बळी पडत आहेत. जेव्हा आपल्या रक्तातील चरबीचे प्रमाण जास्त होते, तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. मग रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, ज्यामुळे प्रथम रक्तदाब वाढतो आणि नंतर हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. अशा परिस्थितीत, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि जीवनशैली सुधारण्यासाठी तसेच खाण्याच्या सवयी सुधारण्याचे मार्ग शोधणे आवश्यक आहे.


या 2 गोष्टींद्वारे कोलेस्ट्रॉल करा कमी


ग्रेटर नोएडा येथील GIMS हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी झी न्यूजला सांगितले की, जर आपण दररोज स्वयंपाकघरात ठेवलेल्या दोन गोष्टींचे सेवन केले तर उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या गंभीर समस्येवर सहज मात करता येते. 


दालचिनीचा वापर करा


डॉ. आयुषी यांच्या मते, दालचिनीचे दररोज सेवन उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरु शकते. यासाठी प्रथम या मसाल्याचे तुकडे घ्या आणि नंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये चांगले बारीक करुन काचेच्या डब्यात ठेवा. सकाळी उठल्यावर चिमूटभर दालचिनी पावडर खा. त्याचे फायदे काही दिवसात दिसून येतील. तथापि, हे लक्षात ठेवा की या मसाल्याचे जास्त प्रमाणात सेवन करु नका कारण ते गरम पडल्यास शरीराचे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.


अळसीच्या बिया खा 


जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी सुद्धा म्हटले जाते. अळशीच्या बिया अनेक समस्या दूर करण्यासाठी ओळखल्या जातात, परंतु उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी त्याचा वापर नक्कीच करा. अळसीच्या बिया घ्या आणि चांगल्याप्रकारे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करा आणि नंतर कोमट पाण्यात एक चमचा फ्लेक्ससीड पावडर मिसळा आणि दररोज प्या. यामुळे वाईट कोलेस्टेरॉल तर कमी होईलच, पण चांगले कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढेल.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)