मुंबई : वजन कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. डाएट, व्यायाम असे बरेच काही. अनेकदा आपल्या आवडीचे पदार्थ खाण्याच्या इच्छेलाही मूरड घालतो. पण दुग्धजन्य पदार्थ, कार्ब्स घेणे टाळल्यामुळे आपल्याला बरेचसे पोषकघटक मिळत नाहीत. म्हणून हे काही पदार्थ प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढणार नाही. 


बटाटा:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डाएट फूडच्या यादीतून प्रामुख्याने कार्ब्स वगळले जातात. परंतु, बटाटे हे फायबर आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे पोट भरण्यास मदत होते.


पास्ता:


गव्हाचा पास्ता आणि ब्राऊन राईस या कार्ब्सयुक्त पदार्थांमध्ये देखील फायबर भरपूर प्रमाणात असते. ते खाल्याने serotonin ची पातळी वाढते व मूड चांगला होतो.


चीज:


वेट लॉस मिशनवर असताना चीज खाणे आपण पूर्णपणे टाळतो. परंतु, आहारात मोजक्या प्रमाणात चीज घेणे योग्य ठरेल. कारण त्यात मसल बिल्डिंग प्रोटीन असतात. त्याचप्रमाणे त्याचे पचन लवकर होत नसल्याने खूप काळापर्यंत पोट भरलेले राहते.


फळे:


साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही फळे खाणे टाळता. पण फळाच्या एका तुकड्यात १५ ग्रॅम साखर असते. तितकीच साखर दुधाच्या एका कपात देखील असते. परंतु, फळांचा रस किंवा फ्रुट स्मूथीज जास्त प्रमाणात घेऊ नका.


सुकामेवा:


सुकामेव्यामध्ये अधिक कॅलरीज असतात. परंतु, वजन कमी करण्याच्या मिशनमध्ये बदाम खाल्यास फायदा होईल. कारण त्यामुळे अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवता येते. म्हणून बदाम खाणे टाळू नका.