मुंबई : उन्हाळा सुरु झाला आहे. कडक उन्हामुळे आणि येणाऱ्या घामामुळे शरीरातील पोषकतत्त्व कमी होतात. त्यामुळे शरीरात कमी झालेली पोषकतत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी काही ठराविक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. हे ५ पदार्थांचे उन्हाळ्यात सेवन केल्याने डिहाइड्रेशनपासून सुरक्षित राहण्यास मदत होईल. तर जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ...


काकडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिहाइड्रेशन आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी काकडी अत्यंत फायदेशीर ठरते. यात ८८% पाणी असते. काकडीला मीठ लावून खाल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते.


दही


दह्यात असलेल्या बॅक्टेरीया पचनास मदत करतात. त्यामुळे इम्युनिटी सिस्टम सुधारते. त्यामुळे उन्हाळ्यात रोज दही, ताक, लस्सी आणि रायता यांसारख्या पदार्थांचा नक्की आस्वाद घ्या.


कैरी


डिहाइड्रेशनमुळे शरीरात कमी होणारे पोषकतत्त्वांची भरपाई करण्यास कैरी उत्तम ठरते. कैरी खा किंवा कैरीचे पन्हे प्या. कैरीचे पन्हे बनवताना त्यात बारीक चिरलेला कांदा आणि भाजलेले जिरे घाला.


टरबूज


उन्हाळ्यात हे फळ आर्वजून खाल्ले जाते. यात कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे खाल्याने अन्नपचन व्यवस्थित होते आणि उन्हापासून होणाऱ्या त्रासावर आराम मिळतो.


बार्ली


मधुमेहींसाठी हा अतिशय हेल्दी पर्याय आहे. त्यामुळे ब्ल़ड ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यासाठी बार्लीचे अवश्य सेवन करा. उन्हापासून वाचण्यासाठी याचे सूप प्या किंवा याचा पराठाही बनवता येईल.