आहारात या `4` पदार्थांंचा समावेश केल्यास आटोक्यात येईल बद्धकोष्ठतेचा त्रास
आहारावर तुमचं आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे.
मुंबई : आहारावर तुमचं आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे.
आजकाल फास्ट फूडकडे ओढा वाढत असल्याने पचनाचे विकार सर्रास आढळतात. अशापैकी एक म्हणजे 'बद्धकोष्ठता'.
बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात काही घटकांचा समावेश करणं आरोग्याला फायदेशीर ठरते. म्हणूनच बद्धकोष्ठतेचा वेदनादायी त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात या घटकांचा समावेश करा.
भात
भाताचा आहारात समावेश केल्यास पचनक्रिया सुधारते. युरिक अॅसिड सारखे घातक घटक बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे वजन वाढतं म्हणून भात टाळू नका. भातामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.
बटाटा
बटाट्यातील फायबर घटक पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करते. उकडलेला बटाटा भाजीच्या स्वरूपात आहारात घेऊ शकता. पराठ्यामध्येही बटाट्याचा वापर केला जाऊ शकतो.
भोपळा
पचनाचे कार्य सुधारण्यासाठी भोपळा फायदेशीर आहे. त्यामधील फायबर घटक पचन संस्थेचे कार्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर भोपळा फायदेशीर ठरतो.
फरसबी
फरसबीचा आहारात समावेश करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. फरसबीमध्ये प्रोटीन घटक मुबलक मिळतात.