मुंबई : चेहरा सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. मुली अनेक सौंदर्य प्रसाधणांचा सुद्धा वापर करतात. पण ते त्वचे साठी घातक सुद्धा ठरू शकतात. अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा जेवनानंतर अनेकांना पान खाण्याची अनेकांना सवय असते. पण या खाण्याच्या पानांमध्ये सौंदर्याचं रहस्य दडलेलं आहे. या पानाचा केवळ खाण्यासाठीच नव्हे तर सौंदर्य खुलविण्यासाठी देखील उपयोग होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेहरा उजळण्यासाठी - खायची पाने ३-४ मिनिटे पाण्यात उकळून घ्या. आता याची पातळ पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. तुम्ही यामध्ये थोडे बेसन घालू शकता. १५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. 


मुरुमांपासून सुटका - पानाच्या फेसपॅकने चेहरा उजळण्यासह डाग व मुरूमांपासून सुटका मिळते. पानाच्या पेस्टमध्ये थोडी हळद मिसळून घ्या. ही पेस्ट मुरुमांवर लावा. काही वेळाने चेहरा धुवून घ्या. असे २-३ वेळा केल्यास मुरुमांपासून सुटका मिळेल.


शरीरावर येते चमक - अंघोळीच्या पाण्यात पान मिसळून वापरल्याने घामाच्या दुर्गंधीपासून तुमची सुटका होईल.


माऊथ फ्रेशनर - पान हे उत्तम माऊथ फ्रेशनर आहे. पानांना उकळून त्यापासून माऊथ वॉश बनवता येतो. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात पाने मिसळून उकळून घ्या. हे पाणी एका भांड्यात साठवून ठेवा. याच्या नियमित वापराने तोंडाचा दुर्गंध घालवता येईल.