पार्टनरला सॉरी म्हणण्यापूर्वी या 4 गोष्टी माहित करुन घ्या... नाहीतर याचा वाईट परिणाम होईल
जर तुम्ही शांतपणे याचा विचार केलातर, एक दिवस असा येऊ शकतो की, तुमच्या पार्टनरला तुमच्या या माफीची सवय लागेल.
मुंबई : नात्यामध्ये जेव्हा प्रेम, विश्वास आणि समजंसपणा असतो, तेव्हा ते नातं टिकवणं फार कठीण काम नसतं. नात्याची किंमत जर प्रत्येकाने केली तर, कोणत्यात नात्यात भांडणं आणि दुरावा येणार नाही. जे एक हेल्दी रिलेशनशिपसाठी चांगलं असतं. असे अनेक लोकं आहेत, जे आपलं नातं टिकवण्यासाठी आणि आपल्या जोडिदाराला आयुष्यातून गमवू नये म्हणून स्वत:ची चूक नसतानाही माफी मागताता किंवा सॉरी म्हणतात.
तसे पाहाता असं करणं चुकीचं नाही. कारण यामुळे भांडणं कमी होतात. परंतु असं सारखं सारखं करणं भविष्यात खूप मोठी समस्या बनू शकते. जर तुम्ही शांतपणे याचा विचार केलातर, एक दिवस असा येऊ शकतो की, तुमच्या पार्टनरला तुमच्या या माफीची सवय लागेल, ज्यामुळे तो तुमच्यावर
वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत करेल. त्याचा स्वभाव तुम्हाला नेहमीच सॉरी बोलायला भाग पाडेल.
त्यामुळे हे लक्षात घ्या की, रिलेशनशिपमध्ये प्रत्येक वेळी तुम्ही सॉरी म्हणालच असे नाही, पण जर तुम्ही असे करत असाल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
तुमचा पार्टनर तुमच्याकडे येऊन गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करत नसेल, तर तुमचं सॉरी बोलणं वाया जात आहे. ज्यावरुन असे स्पष्ट होत आहे की, तुम्ही अशा जोडीदारासोबत पुढे जात आहात, ज्याच्या आयुष्यात तुमचा आणि तुमच्या सॉरीला काहीही महत्व नाही.
त्यामुळे हे लक्षात घ्या की, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही भांडण झाल्यावर सॉरी म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्यावर वर्चस्व गाजवायला आमंत्रित करता. चूक तुमचीच असेल, तेव्हा सॉरी बोलून प्रकरण संपवायला काहीच हरकत नाही, पण जोडीदाराची चूक झाल्यावरही जर तुम्ही सर्व काही पुन्हा पुन्हा नॉर्मल करण्याचा प्रयत्न केलात, तर काही काळानंतर पार्टनर तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात करेल.
कोणताही वाद सोडवणे हे दोन्ही जोडीदारांचे काम आहे, परंतु जेव्हा तुम्ही यासाठी वारंवार प्रयत्न करता, तेव्हा भविष्यात अशा गोष्टी अडचणीत आणतात. स्वतःला सॉरी बोलायला लावून तुमचा पार्टनर स्वतःला बरोबर मानायला लागतो आणि अहंकाराने भरून जातो. यामुळे तो तुमच्या निर्णयांकडे लक्ष देणंही सोडून देऊ लागतो.
तुमच्या मताचाही त्याला काही फरक पडत नाही. त्याला फक्त त्याचे निर्णय योग्य वाटू लागतात. अशा जोडीदारासोबत काही काळानंतर तुम्हालाही गुदमरल्यासारखे वाटू लागते, ज्यामुळे नाते पूर्णपणे कमकुवत होते.
त्यामुळे जेव्हा आपली चूक नसते तेव्हा सॉरी म्हणू नका. अशा वेळी प्रत्येक वेळी सॉरी म्हणण्यापेक्षा थोडे कठोर व्हा आणि जोडीदाराला त्याची चूक लक्षात आणून द्या. जेणेकरून जोडीदाराला समजेल की आता त्यांचे मनमानी वर्तन चालू शकत नाही.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)