मुंबई : वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये भात किंवा चपाती यांच्यापैकी कशाचा समावेश करावा? हा प्रश्न बहुधा प्रत्येकाच्या मनात असेल. भातामुळे वजन वाढतं तसंच पोट सुटतं असा लोकांना समज आहे. पण तुम्हाला माहितीये का चपाती आणि भात खाऊनही वजन कमी करता येतं, फक्त ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय अन्नाचा मुख्य आहार म्हणजे चपाती आणि भात. दोन्हीमध्ये कर्बोदकं जास्त असतात. अशा परिस्थितीत, भात किंवा चपातीमध्ये काय चांगलं आहे हे तुम्ही ठरवू शकत नसाल, तर ही बातमी नक्की वाचा.


चपाती आणि भात खाल्ल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि ग्लुकोज शरीराला ऊर्जा देते. म्हणूनच चपाती आणि थोडा भात खाण्याचा सल्ला दिला जातो. भात आणि चपातीमध्ये फक्त कर्बोदके नसून त्यामध्ये प्रथिनं, जीवनसत्त्वं हे पोषक घटक देखील असतात. 


वजन कमी करण्यासाठी काय खावं चपाती की भात?


भात आणि चपाती यांच्यातील पौष्टिक घटकांचं मूल्य जवळपास सारखं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात जे आवडतं ते समावेश करू शकता. भातामध्ये चपातीपेक्षा जास्त कर्बोदके असतात. भात खाल्ल्याने पोट लवकर भरत असलं तरी स्टार्चमुळे ते लवकर पचते. त्यामुळे पुन्हा भूक लागते. 


दुसरीकडे चपातीमध्ये भातापेक्षा जास्त प्रोटीन आणि फायबर असतं, ज्यामुळे पोट थोडा जास्त काळ भरलेलं राहतं. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत चपातीमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरससारखी खनिजं जास्त असतात. दोघांचा ग्लायकेमाइन इंडेक्स समान असतो. पौष्टिक मूल्य पाहता, तुम्ही चपातीला आहाराचा भाग बनवू शकता, कारण यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं. दरम्यान आपण भात किंवा चपाती यापैकी काहीही तुम्ही वजन कमी करण्यासाठी खाऊ शकता.