तुम्ही खात असलेलं चॉकलेट विषारी तर नाही? पाहा व्हिडीओ
मुलांच्या हातात परदेशातील विष? तुमची मुलं खातायंत विषारी चॉकलेट?
स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई : तुमची मुलं चॉकलेट खात असतील तर काळजी घ्या. कारण हेच चॉकलेट मुलांसाठी विष ठरू शकतं. कारण परदेशातून आयात करण्यात आलेल्या चॉकलेटचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट्स खूप आवडतात. त्यामुळेच मुलांना आकर्षित करण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स उपलब्ध आहेत.
हेच चॉकलेट्स तुमच्या मुलांसाठी जीवघेणी ठरू शकतात. कारण या चॉकलेटमधील घातक रंग लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करत आहेत. विशेष करून परदेशी चॉकसलेट्समध्ये या रंगांचा वापर जास्त असतो आणि याच चॉकलेट्स सर्वत्र सर्रास विक्री सुरू आहे.
fssai च्या नियमानुसार विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये कोणते पदार्थ वापरण्यात आले याची माहिती पाकिटावर देणं बंधनकारक आहे. मात्र परदेशातून आयात करण्यात आलेल्या चॉकलेट्समध्ये रंगांचं प्रमाण किती आहे याची माहितीच नसते. त्यामुळे अशी चॉकलेट्स मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात.
त्यामुळे असे चॉकलेट्स घेतांना सावध राहा. चॉकलेटमध्ये कोणता कंटेट वापरण्यात आलाय त्याची माहिती रॅपरवर नसेल तर तात्काळ fssaiच्या साईटवर तक्रार करा. कारण सवाल तुमच्या आमच्या चिमुकल्यांच्या जीवाचा आहे.