Urine problem : रात्री सतत लघवीला येतेय! तुम्हाला `या` आजाराचा धोका
रात्री सतत लघवीला येत असेल तर आताच सावध व्हा!
मुंबई : काहींना रात्री झोपल्यानंतर सतत लघवीला (frequently peeing) येत असते. रात्री जेवल्यानंतर जास्त पाणी पिण्यामुळे त्यांना सतत लघवीला (peeing) येत असल्याचा कयास असतो. मात्र ही लघवी गंभीरही असू शकते. कारण ही लघवी काही गंभीर आजाराचे तुम्हाला संकेत देत असते. त्यामुळे तुम्हाला अशी समस्या उद्भवण्यामागचे कारण काय असते हे जाणून घेऊयात.
जर तुम्हालाही नेहमीपेक्षा जास्त लघवी (peeing) व्हायला लागली तर लगेच डॉक्टरांना दाखवा. जेणेकरून तुम्ही कोणत्या गंभीर आजारांचा सामना करत आहात, हे तुम्हाला कळणार आहे.अनेकदा लोक म्हणतात की त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते, त्यामुळे त्यांना पुरेशी झोप लागत नाही. या समस्येला वैद्यकीय भाषेत नोक्टूरिया (nocturia) म्हणतात.
सतत लघवीला येण्याची कारणे काय?
साधारणपणे रात्री एक ते दोन लघवी (peeing) होते. परंतु यापेक्षा जास्त हे अंतर्गत समस्येचे लक्षण असू शकते.
लघवी (peeing) करण्यासाठी रात्री वारंवार जागे होणे हे कॅफिन, अल्कोहोल, धूम्रपान, तणावामुळे होते. हे सर्व घटक लघवीला चालना देतात. जास्त प्रमाणात मद्य आणि चहा किंवा कॉफीमुळे लघवी निर्माण होते.
म्हातारपणात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळेही नोक्टूरिया (nocturia) हा आजार होतो. त्यामुळे अनेक वेळा युरिन इन्फेक्शन होण्याचा धोकाही वाढतो. यामध्ये लघवी करताना जळजळ होते आणि पोटात दुखते.
टाईप 2 मधुमेह हे देखील या आजाराचे कारण असू शकते. याशिवाय हा आजार किडनी इन्फेक्शन, ब्लॅडर प्रोलॅप्समुळेही होऊ शकतो.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)