मुंबई : पोटदुखी, पेटके आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या आजकाल लोकांमध्ये सामान्य झाल्या आहेत. पावसाळ्यात पोटाशी संबंधित समस्या वाढू लागतात. कारण पावसाळ्यात आर्द्रता वाढल्याने बुरशी आणि बॅक्टेरिया वेगाने पसरू लागतात, ताप, ऍलर्जी आणि संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढू लागतात आणि या सर्वांचा आपल्या पोटावर आणि पचनावर परिणाम होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्ची केळी अतिसारावर गुणकारी


कच्ची केळी पोटाशी संबंधित समस्यांमध्ये फायदेशीर ठरते. केळ्यामध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते, जे डायरियाशी लढण्यास मदत करते. उलट्या आणि जुलाबाच्या वेळी शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडते. शरीरातील या इलेक्ट्रोलाइटचे प्रमाणही केळी योग्य ठेवते. कच्च्या केळ्याचे काही तुकडे मध किंवा आले मिसळून खाल्ल्यास पोटदुखीत आराम मिळतो.


जिऱ्याच्या पाण्याने आराम


आजकाल अपचनाची समस्या सामान्य झाली आहे. वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंतही हे दिसून येत आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार जिऱ्याचे पाणी पोटाच्या समस्यांमध्ये आराम देऊ शकते. यामध्ये आढळणारे गॅस्ट्रोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म पोटदुखी, पोटात जळजळ, गॅस, पोट फुगणे आणि उलट्या यांमध्ये आराम देतात.


हळद पोटासाठीही गुणकारी


आयुर्वेदात हळदीचे अनेक फायदे सांगितले आहेत. हळद त्याच्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी देखील ओळखली जाते. पोटाच्या समस्यांवर हळदीचा वापर खूप गुणकारी असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे अस्वस्थताही कमी होते. हे अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते.