मुंबई : टोमॅटो हा आपल्या जेवणातील सगळ्यात महत्वाचा घटक आहे. बरेच लोकं टोमॅटोमधील भाजी खाणं पसंतु करतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की टोमॅटो हा नेहमीच शास्त्रज्ञांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. टोमॅटो ही भाजी की फळ असा वाद त्याच्याबद्दल रंगला आहे. यावर अनेक संशोधने झाली आहेत, शास्त्रज्ञांनी त्यांच्या स्वतःच्या युक्तिने यामागील फायदे तोटे सांगूण त्याबद्दलचे स्पष्टीकरण केलं आहे. बहुतेक शास्त्रज्ञांनी याला फळ असल्याचे सांगितले आहे, तर याला काही शास्त्रज्ञांकडून विरोध करण्यात आला. तुम्हाला काय वाटतं, टोमॅटो खरोखरच भाजी आहे की फळ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोमॅटोच्या गुणवत्तेवर नजर टाकली तर लक्षात येईल की, टोमॅटो हे एक फळ आहे, पण भाजीपाल्यांमध्ये त्याचा समावेश होण्याचीही काही कारणेही आहेत. त्यामुळेच टोमॅटो हा चर्चेचा विषय ठरला आहे. यावर कोणते युक्तिवाद दिले जातात हे जाणून घ्या?


टोमॅटो या फळाचे अनेक फायदे आहेत


एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या अहवालानुसार, विज्ञान असे सांगते की,जे फुलांच्या अंडाशयातून विकसित होते ते फळ असते, ज्यांमध्ये अनेक बिया आढळतात. टोमॅटोचेही असेच आहे, ज्यामुळे तसे पाहिले तर टोमॅटो फळाच्या श्रेणीत येतो.


ऑक्सफर्ड डिक्शनरी त्याला फळ म्हणते


त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर ऑक्सफर्ड डिक्शनरीने टोमॅटेचा समावेश फळांच्या श्रेणीत केला आहे. शब्दकोशानुसार, टोमॅटो हे एक मऊ लाल फळ आहे ज्यामध्ये रस असतो. परंतु ते भाजी म्हणून देखील वापरले जाते. त्याचबरोबर केंब्रिज डिक्शनरीमध्ये टोमॅटोला लाल गोलाकार फळ असे लिहिले आहे, ज्यामध्ये अनेक बिया असतात.



टोमॅटोला खाण्याच्या पद्धतीमुळे ते भाजीमध्ये देखील मोडतं.


अहवालानुसार, फळामध्ये गोडपणा आणि फायबर असते. टोमॅटोमध्ये फळांचे दोन्ही गुण आहेत. आता त्यात भाज्यांचे कोणते गुण आहेत ते समजून घेऊ.


विज्ञान असेही म्हणते की, फळे नेहमीच मिष्टान्न म्हणून सादर केली जातात, तर भाज्यांच्या बाबतीत असे नाही. मुख्य कोर्समध्ये भाज्यांचा समावेश आहे. या अर्थाने टोमॅटोचा भाजीत समावेश होतो.


टोमॅटोला भाजी मानण्यामागचे एक कारण म्हणजे ते नेहमीच सॅलडमध्ये किंवा भाजी म्हणून खाल्ले गेले आहे, म्हणून त्याला भाजी मानले गेले. फळांप्रमाणे याला फारसा गोड रस नसतो किंवा इतर फळांसोबत त्याला लोकं खाणं देखील परंत करत नाहीत.


संशोधनात हे सिद्ध झाले आहे की टोमॅटोमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात आणि ते अनेक आजारांपासून दूर ठेवतात. त्यामुळे याला फळ समजा किंवा भाजीपाला समजा, ते तुमच्यावर अवलंबून आहे, पण त्याचा शरीरासाठी खूप उपयोग होतो.