मुंबई : गरोदरपणाच्या काळात नेमकं काय खावं आणि किती खावं? हा प्रश्न अनेकींना पडतो. मात्र तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या नियमित आहाराचं नियोजन करणं गरजेचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसात गरोदरपणाचा काळ, वाढता उन्हाळा आणि औषधगोळ्यांच्या मारामुळे शरीरात वाढणारी उष्णता आटोक्यात ठेवणं गरजेचे होते. उन्हाळयात वाढणारी डोकेदुखी आणि पित्त आटोक्यात ठेवण्यासाठी खास टीप्स


का ठरतो गुलकंद फायदेशीर ?


गुलकंदामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए घटक मुबलक असतात. नियमित गुलकंदाचे आहारात समावेश केल्यास शरीरात उष्णता आटोक्यात राहण्यास, उर्जा मिळण्यास, पचनक्रिया नियामित होण्यास मदत होते. 


उन्हाळ्याच्या दिवसात डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासही गुलकंद फायदेशीर ठरते.


गुलकंदाचे फायदे


गुलकंदाच्या सेवनामुळे पोटाचे आरोग्य जपण्यास मदत होते. सोबतच आळस कमी होतो. मांसपेशींचे दुखणे कमी होते. जळजळ कमी होते. 


नाकाचा घोळणा फुटण्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठीदेखील उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरते. तुम्हांला हा त्रास असेल तर उन्हाळ्यात बाहेर पडण्यापूर्वी 2 चमचे गुलकंद खावे. 


सामान्य लोकांप्रमाणेच गरोदर स्त्रीयांनादेखील गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरते. गरोदरपणाच्या दिवसात बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून आराम मिळवण्यासाठी गुलकंद फायदेशीर ठरते. पहा घरच्या घरी कसा  बनवाल ‘ गुलकंद’ ?