मुंबई : बदाम केवळ आरोग्यासाठी नव्हे तर तुमच्या सौंदर्यासाठीदेखील तितकंच फायदेशीर आहे. बदामाच्या सेवनामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत होते. प्रामुख्याने  डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी बदाम फायदेशीर ठरते. 


खास टीप्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदाम आणि मध डार्क सर्कल्सचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. याकरिता अर्धा चमचा बदामाच्या तेलात अर्धा चमचा मध मिसळा. हे मिश्रण रात्रीच्या वेळेस झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली लावावे.  


बदामाचं तेल गुलाबपाण्यात मिसळा. हे मिश्रण डार्क सर्कल्सचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हा उपाय नियमित केल्याने त्रास कमी होईल. या मिश्रणाने 2-3 मिनिटं मसाज करा. रात्रभर हे मिश्रण असेच राहून द्या. 


बदामाचं तेल आणि कोरफडीचा गरदेखील अत्यंत फायदेशीर आहे. डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी हे मिश्रण फायदेशीर आहे. यामुळे डोळ्यांच्या खाली थंडावा निर्माण होण्यास मदत होते. थकव्यामुळे डोळ्यांखाली आलेला काळसरपणा कमी होतो. 


अर्धा चमचा कोरफडीचा गर आणि बदामाचं तेल एकत्र करा. हे मिश्रण डोळ्यांखाली लावा. तासाभराने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे घरच्या घरी डार्क सर्कल्सचा त्रास कमी करण्यास मदत होते.