FASHION TIPS:  प्रदूषण बदलतं वातावरण यांचा केसांवर परिणाम होतो ते ड्राय होतात  मग केस फ्रिझी होतात अशा वेळी आपण पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करून घेतो त्यासाठी खूप किंमतदेखील मोजावी लागते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला कोणी सांगितलं कि तुम्हाला स्ट्रेट हेअर्स हवे असतील तर कोणत्याही मशीनची किंवा ट्रीटमेंटची गरज नाही तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही ..पण तुम्हाला कुठे बाहेर जायचंय पार्टी आहे आणि तुम्हाला स्ट्रेट केस हवे आहेत आणि तुम्हाला स्ट्रेटनिंग मशीनचा वापरही  करायचा नाहीये तर काही अशा गोष्टी आहेत ज्या वापरून तुम्ही सॉफ्ट सिल्की स्ट्रेट हेअर मिळवू शकता ते हि घरगुती गोष्टी वापरून.. 


दूध 


घरात सर्रास असणारी गोष्ट म्हणजे दूध . मिल्क स्प्रेद्वारे तुम्ही तुमचे फ्रीझी केस सरळ करू शकता .यासाठी तुम्हाला आठवडाभरासाठी पुरेल इतका स्प्रे तयार  करून  ठेवायचं आहे यासाठी एक स्प्रे बॉटल ची गरज लागेल .मात्र ही बॉटल आधी व्यवस्थित धुवून घेणं गरजेचं आहे. दूध चांगलं उकळून थंड करून घ्या आणि मग बाटलीत भरून ठेवा हि बाटली फ्रीझ मध्ये ठेऊन द्या. नंतर लागेल तसा हा स्प्रे केसांवर मारा जेव्हा तुम्हाला फ्रीझी केस सरळ हवे आहेत. काही काळ केस असेच ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने केस धूऊन टाका 


कॅस्टर ऑइल आणि कोकोनट ऑइल 


कॅस्टर ऑइल नेहमी  केसांसाठी वापरलं जात. केसांच्या समस्येवर उपाय म्हणून याचा वापर केला जातो..कॅस्टर ऑइल मध्ये नारळाचं तेल घालून काही वेळ ते गरम करा  आणि कोमट  झाल्यावर केसांना लावा यावेळी हे तेल केसांच्या मुळावर लागेल याची दक्षता घ्या त्या नंतर टॉवेल ने केस गुंडाळून ठेवा तासाभराने थंड पाण्याने आणि चांगल्या शाम्पूने केस धुवून टाका . कॅस्टर ऑइल केसांना रिपेअर करायला मदत करत तर कोकोनट ऑइल मुळे केसांना हायड्रेशन मिळत ज्यामुळे केस सॉफ्ट राहतात. 



हेअर ट्रीटमेंटमुळे केसांची खूप हानी होते ,केस स्ट्रेटनिंग करणं किंवा ड्रायरचा अतिवापर करण्यामुळे केस रुक्ष होतात अशात  हे DIY  वापरून एक वेगळा प्रयोग नक्की करू शकता.