लहान मुलांना नाष्ट्यामध्ये द्या या 4 गोष्टी, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
सकाळी नाष्ट्यामध्ये तुम्ही पुढील पदार्थ दिले तर त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरेलं.
Health News : सर्व पालकांना त्यांच्या मुलांच्या विकासाची खूप काळजी असते. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी लाखात एक दिसावी. यासाठी पौष्टिक आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी नाष्ट्यामध्ये तुम्ही पुढील काही पदार्थ दिले तर त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरेलं.
पीनट बटर
जिम ट्रेनर आणि आहारतज्ज्ञ प्रत्येकाला पीनट बटर खाण्याचा सल्ला देतात. कारण हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. मुलांच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक देखील यामध्ये समाविष्ट असतात. लोह, पोटॅशियम, खनिजे आणि जीवनसत्त्वे इ. ब्राऊन ब्रेडमध्ये खाल्ल्याने स्नायूंचा विकास होतो.
उपमा
सकाळच्या नाष्ट्यामध्ये उपम्याचा समावेश करावा, याने वजन वाढत नाही आणि पोट भरलेलं राहतं. उपमा रोज खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे मुलांना नाष्ट्यामध्ये उपमा देणं हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
लापशी
लापशीचा नाष्ट्यामध्ये समावेश केल्याने भरपूर फायबर आणि कॅल्शियम मिळतं. मेंदूचा विकास आणि हाडांची ताकद वाढवण्यास मदत होते. त्यासोबतच स्मरणशक्ती चांगली राहते.
अंड
अंड्यामध्ये प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. हे स्नायूंच्या बळकटीसाठी देखील चांगलं मानलं जातं. अंड्यांमध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. अंडी रोज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि शरीरात रक्ताची कमतरता राहत नाही.