Neeraj Chopra च्या फिटनेसचं रहस्य! लहानपणीच्या लठ्ठपणावर केली मात जाणून घ्या डाएट प्लॅन
नीरज चोप्राने टोकिओ ऑलंपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे. नीरजच्या बालपणी त्याचे वय 80 किलो होते.
नवी दिल्ली : नीरज चोप्राने टोकिओ ऑलंपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला आहे. नीरजच्या बालपणी त्याचे वय 80 किलो होते. आज तो जबरजस्त फीट आणि तंदरूस्त तरुण आहे. जाणून घेऊया फॅटीवरून कसा फिटनेस फ्रीक बनला नीरज
टोकिओ ऑलंपिकमध्ये नीरज चोप्राने जेवलिन थ्रोमध्ये सुवर्णपदक मिळवले. नीरजने गोल्ड मेडल आणले. आणि देशाला 13 वर्षानंतर पुन्हा गोल्ड मेडल मिळाले. या दरम्यान नीरजच्या फिटनेसबाबत देशात चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नीरज स्वतःला फीट ठेवण्यासाठी काय करतो. याबाबत जाणून घ्या
घरीच वर्कआऊट
नीरज चोप्रा एक ऍथेलिट असण्यासोबतच एक फौजी देखील आहे. त्यामुळे तो शिस्तप्रिय आयुष्य जगत असावा. तसे तर नीजर जिममध्ये जाऊन व्यायाम करणे पसंत करतो परंतु कोविडमुळे नीजर घराच्या पायऱ्या आणि रुममध्येच व्यायाम करतो.
नीरजचे वजन आपल्या वयाच्या 11 वर्षी 80 किलो इतके होते. आज ते फिटनेस फ्रीक बनले आहे. त्यासाठी दररोज शिस्तबद्ध पद्धतीने व्यायाम करीत असतो.
डाएट प्लॅन
सामन्याच्या दिवशी नीरज फक्त सॅलेड आणि फ्रुट्स खाणं पसंत करतो. त्यामुळे शरिरात ऍनर्जी राहते आणि स्थूलपणा जाणवत नाही. ब्रेकफास्टमध्ये नीरज डेली ब्राऊन ब्रेड आणि ऑमलेट घेतो. लंच आणि डिनरमध्ये ग्रिल चिकन ब्रेस्ट, ग्रिल सेलमॉन आणि अंडी खातो. भूक लागल्यास नीरज फळांचे ताजे ज्युस घेणे पसंत करतो. नुकतेच त्याने आपल्या डाएटमध्ये सॉलमन फिश सामिल केली आहे.
नीरजचे आवडीचे फूडमध्ये वेजिटेबल बिर्याणी आणि ऑमलेट होय. फास्टफूडमध्ये नीरजला पाणीपूरी खाण्यास आवडते.