CT Scan, MRI, Xray ची गरज नाही, फक्त Eye स्कॅनिंगद्वारे आजाराचे निदान; Google AI चा मेडिकल क्षेत्रात मोठा बदल
तंत्रज्ञान क्षेत्रात आगमन झालेल्या चॅटजीपीटीचं सध्या प्रचंड कुतुहल आहे. मात्र या चॅटजीपीटीमुळे आणि आर्टिफिअल इंजेलिजन्समुळे दहा क्षेत्रातल्या नोक-यांना धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता वैद्यकीय क्षेत्रात देखील आर्टिफिअल इंजेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे.
Google AI : तंत्रज्ञान क्षेत्रात आगमन झालेल्या AI अर्थात आर्टिफिअल इंजेलिजन्समुळे अनेक क्षेत्रात काम अधिक जलद आणि अचूक झाले आहे. अनेक क्षेत्रात सध्या आर्टिफिअल इंजेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आता लवकरच वैद्यकीय क्षेत्रात आर्टिफिअल इंजेलिजन्स तंत्रज्ञाचा वापर केला जाणार आहे. सध्या आजारांचे निदान करण्यासाठी रक्तचाचणी व्यतीरीक्त CT Scan, MRI आणि Xray सारख्या चाचण्यांचा वापर केला जातो. आता मात्र, या चाचण्यांचा वापर करण्याची गरज नाही. कारण, फक्त Eye स्कॅनिंगद्वारे रोगाचे निदान होणार आहे. Google AI च्या मदतीने मेडिकल क्षेत्रात मोठा बदल घडवला जाणार असल्याची माहिती गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी दिली.
इव्हेंटमध्ये दिली Google AI ची माहिती
सध्या ट्विटरवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुंदर पिचाई हे गुगल एआयचे फीचर्स बाबत माहिती देताना दिसत आहेत. आर्टिफिअल इंजेलिजन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारक बदल कसे घडवून आणेले जाऊ शकतात याबाबत देखील ते सांगत आहेत.
Eye स्कॅनिंगद्वारे कसे होणार रोगाचे निदान?
अनेक गंभीर आजारांचे निदान फक्त रक्त चाचणीद्वारे करता येत नाही. अशा वेळेस CT Scan, MRI, Xray सारख्या चाचण्या केल्या जातात. यामध्ये रोगाचे अचूक निदान होते. मात्र, या चाचण्यांचे निकाल येण्यासाठी वेळ लागतो. तर, Eye स्कॅनिंगद्वारे अगदी अचूक आणि कमी वेळाच रोगाचे निदान करता येईल असा दावा केला जात आहे.
24 तासांत रुग्णाची स्थिती कशी असेल याचा अंदाज लावता येणार
Eye स्कॅनिंगद्वारे Age, Biological Sex, Smoking हॅबिट, डायबिटीज, BMI आणि ब्लड प्रेशर सारख्या आजारांबाबत तात्काळ माहिती मिळेल. Eye स्कॅनिंग तपासणी करताना प्रीडिक्ट आणि एक्चुअल कंडिशन असे दोन ऑप्शन असणार आहेत. Google AI च्या मदतीने डॉक्टर अनेक प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांचे एकाचवेळी निदान करु शकते. याच्या मदतीने एखाद्या रुग्णाची स्थिती 24 तासानंतर कशी असेल. त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे का? रुग्णाला कोणत्या प्रकारचे उपचार देण्याची गरज आहे असे निर्णय डॉक्टर झटकन घेवू शकतात.