Google Trending Health Topics 2022: यंदाचं 2022 हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवसच उरले आहेत. येत्या रविवारी आपण सगळे नव्या वर्षाचं (New Year) स्वागत करणार आहोत. अशातच यंदाच्या वर्षी कोणत्या गोष्टी इंटरनेटवर अधिक सर्च (Internet search) झाल्या याचा ट्रेंड सुरु आहे. यामध्ये आरोग्याशी संबंधित गोष्टींचाही समावेश आहे. आरोग्याशी निगडीत इंटरनेटवर टॉप ट्रेंडिंग प्रश्न कोणते विचारले गेले, हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्याविषयी टॉप ट्रेंडिंग प्रश्न


सरोगसी नेमकं काय असतं?


ज्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री (Priyanka Chopra) सरोगसीद्वारे आई झाली होती, तेव्हा सरोगसी काय असतं, हे अधिक प्रमाणात इंटरनेटवर सर्च करण्यात आलं. याचवेळी साऊथ अभिनेत्री नयनतारा हिने देखील सरोगसीच्या मदतीने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. सरोगसी हा शब्द ऐकून आई बनू इच्छिणाऱ्या स्त्रीच्या मनात ‘What is surrogacy’ याचा इंटरनेटवर प्रचंड शोध घेतला गेला.


myositis काय आजार आहे?


दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभुला असलेला myositis या आजाराबाबतही गुगलवर अधिक सर्च केलं गेलंय. इंटरनेटवर लोकांनी ‘What is myositis’ असं सर्च केलं. मायोसायटीस शरीरात होणारी एक दुर्मिळ स्थिती आहे. ज्यामुळे तो व्यक्ती स्वतःचा तोल सांभाळू शकत नाही.


वॅक्सिनेशन सर्टिफिकेट कसं डाऊनलोड करायचं?


गुगलवर कोरोना वॅक्सिनेशन झाल्यानंतर सर्टिफिकेट डाऊनलोड कसं करावं यासाठी प्रश्न विचारण्यात आले. 2022 साली How to download Vaccination Certificate असं अधिक प्रमाणात सर्च करण्यात आलं. 


गरोदरपणात मोशन कसे थांबवावेत? How to stop motion in pregnancy


Google वर आरोग्याशी संबंधित प्रश्नांमध्ये महिलांचा एक प्रश्न ट्रेंड होत होता. ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान जुलाब होणं कसं थांबवावं हा प्रश्नही इंटरनेटवर अधिक प्रमाणात विचारलेला दिसला. अनेक महिलांना असा त्रास होतो, त्यावेळी त्या इंटरनेटची मदत घेताना दिसतात.