सरकारी अहवालातून भारतीयांच्या सेक्शुअल पार्टनर्सच्या संख्येबाबत मोठा खुलासा!
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्याच्या पाचव्या सर्वेक्षणात भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले.
मुंबई : आजही भारतात लोक सेक्सबद्दल बोलणे टाळतात. ही लाज आणि संकोच कधीकधी लोकांना धोकादायक रोग देतात. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्याच्या पाचव्या सर्वेक्षणात भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले.
या सर्व्हेक्षणात प्रथमच लैंगिक संबंध ठेवण्याचे वय, लैंगिक भागीदारांची संख्या आणि लैंगिक संबंधासाठी पैसे देणे यासारख्या गोष्टींचा समावेश होता.
नॅशनल फॅमिली हेल्थ अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की, एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार किंवा घरात राहणार्या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याने एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका आणखीन वाढतो.
दरम्यान सरकारच्या या अहवालातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. घरापासून दूर असणाऱ्या व्यक्तींचे एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर असल्याचं दिसून आलं. लोक एक महिना किंवा त्याहून अधिक काळ घरापासून दूर असले तरीही एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हा कल सुशिक्षित आणि श्रीमंत भारतीयांमध्ये अधिक दिसून आला.
भारतीयांचे किती सेक्शुअल पार्टनर्स?
या सर्व्हेमध्ये 15-49 वयोगटातील महिला आणि पुरुषांना गेल्या 12 महिन्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात 1 टक्क्यांहून कमी महिलांनी (0.3 टक्के) आणि एक टक्के पुरुषांनी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे मान्य केलं.
एका टक्क्यापेक्षा कमी महिला (0.5 टक्के) आणि 4 टक्के पुरुषांनी सांगितलं की, त्यांचे जोडीदार किंवा घरात राहणार्या व्यक्तीशिवाय त्यांचे इतर कोणाशी शारीरिक संबंध आहेत.