मुंबई : एकेकाळी डोक्यावर पांढरे केस दिसणं हे वार्धक्याचं लक्षण समजले जात असे. मात्र आता अगदी शाळेत जाणार्‍या मुलांमध्येही पांढरे केस दिसतात. झपाट्याने बदलणारी आपली जीवनशैली, आहारातील बदल यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अशापैकी एक म्हणजे अकाली केस पांढरे होणे ! 


नवा ट्रेंड  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकाली केस पांढरे होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जणू काही हा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे. गूगल ट्रेंडच्या सर्च इंटरेस्ट पाहता मागील दहा वर्षांमध्ये गूगलवर 'ग्रे हेअर' म्हणजेच अकाली केस  पांढरे होणं याबाबत सर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने 2015 नंतर या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. 2018 सालचा हा सर्वाधिक सर्च केलेल्या ट्रेंडपैकी एक आहे. 


केवळ समस्या की आजार  


अकाली केस पांढरे होणं ही वर पाहता समान्य गोष्ट वाटत असली तरीही हा एक आजार आहे. वैद्यकीय भाषेमध्ये या आजारला 'केनाइटिस' म्हणतात. इंडियन जर्नल ऑफ डर्मेटोलॉजी 2016 च्या अहवालानुसार, भारतामध्ये केनाईटिस आढळण्याचं प्रमाण 20 वर्ष झालं आहे. भारतीयांमध्ये 20 वर्ष किंवा त्यापूर्वी अकाली पांढरे केस आढळत असल्यास त्यांना हा आजार असल्याचं मानलं जातं. दाढी आणि मिशीचे पांढरे केस या घरगुती उपायांनी ..


कशामुळे होऊ शकतात अकाली केस पांढरे 


अकाली केस पांढरे होण्यामागे अनेक कारणं दडली आहेत. यामध्ये शरीरात हिमोग्लोबीन कमी होणं, अ‍ॅनिमिया, थायरॉईडचा त्रास ही कारणं महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास कमी वयात केस पांढरे होतात. त्यामुळे तुम्हांलाही अकाली केस पांढरे होण्याची समस्या जाणवत असल्यास या कारणांचा नक्की विचार करा आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यावर वेळीच उपचार करणं फायदेशीर ठरतं. लहान वयात केस पांढरे होत असतील तर करा हे उपाय ...