मुंबई : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाळ्याने हवेत गारवा निर्माण होतो आणि मनाला शातंता मिळते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास शरीरावर वाईट परीणामही होतो.  अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या पाहून खाण्याची ईच्छा होत असेल तर जरा थांबा ! कारण पावसाळ्यात उघड्या डोळ्यांनी न दिसणारे खूप प्रकारचे किटाणू आणि किडे त्यावर असतात. तुम्ही जर डाएट किंवा वजन कमी करण्याच्या विचारात आहात तर पालक, ब्रॉकूली, कोशींबीर करत असाल तर त्याचे तोटेही जाणून घ्या. पावसाळ्यात जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खायच्याच असतील तर त्यांना मीठ किंवा लोणी लावून नंतर पाण्याने धुवून खाणे आरोग्यासाठी केव्हाही चांगले. पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचा का खाऊ नये याबद्दल आपण जाणून घेऊया..


भाज्यांमध्ये किटकांच घर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्यात कोबी, फुलकोबी आणि पालक यासारखे पदार्थ खाऊ नये कारण कीटक यामध्ये आपले घर बनवतात. त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहूही शकत नाही. या भाज्या खाण्यामुळे पोटदुखी आणि इतर संबंधित समस्या वाढतात. 


इन्फेक्शनचा धोका


पावसाळ्यात या भाज्या धुवूनही त्याची घाण बाहेर पडत नाही. या भाजीपाला मुख्यत्वे दलदलीच्या जमिनीतून येत असल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.


सुर्यप्रकाश नाही 


मान्सूनमध्ये सुर्यप्रकाश भाज्यांपर्यंत न पोहोचल्याने किटाणूंची संख्या वाढते आणि तशा भाज्या खाल्ल्याने शरीरात संसर्गजन्य रोगांना आमंत्रण मिळते. 


बनावट रंगाचे इंजेक्शन 


भाज्या हिरव्या आणि चमकदार भासविण्यासाठी रंग भरलेल्या इंजेक्शन दिले जाते. बनावट रंगाचा परीणाम शरीरावर होत असतो.


अस्वच्छ भाज्या


रस्त्यावरील हिरव्या पालेभाज्यांनी बनलेले पदार्थ खाऊ नका. त्या चांगल्या प्रकारे धुतल्या गेल्या नसतात. त्यामुळे पोटात बॅक्टेरीया गेल्याने इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे अपचन, जंत, ताप येऊ शकतो.