मुंबई : आजकाल ब्रेकअपचे प्रमाण वाढले आहे. लहान सहान गोष्टी सहन न झाल्याने अनेकजण टोकाची भूमिका घेतात अन् ब्रेकअप करतात. पण लहानशा कारणावरुन टोकाची भूमिका घेणे कितपत योग्य आहे? पहा तुम्ही तर तुमच्या नात्यात या लहान सहान चूका करत नाही ना? तुमच्या या सवयींकडे वेळीच लक्ष द्या. कारण नंतर या सवयीं ब्रेकअपचे कारण ठरु नयेत. प्रत्येक नात्याचा शेवट हा गोड असेलच असे नाही. रिलेशनशिप मध्ये ब्रेक-अप झाल्यास खूप त्रास होतो. जीवन कंटाळवाणे व निरस वाटू लागते. जीवनातील चांगल्या अथवा वाईट परिस्थितीत नात्यामध्ये सुरक्षित वाटण्यासाठी जोडीदारांचा एकमेंकावर विश्वास असणे ही एक महत्वाची गोष्ट असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


#1. प्रत्येक मुलीला आपल्या बॉयफ्रेंडची साथ हवी असते. पण तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुमच्या गर्लफ्रेंडपासून दूर दूर राहत असाल तर ते तिला मुळीच आवडणार नाही. त्यामुळे तिची नेहमी साथ द्या. 


#2. रिलेशनशीपच्या सुरुवातीला पार्टनरकडे नीट लक्ष दिले जाते. मात्र कालांतराने ते कमी होऊ लागते. मग हळूहळू पार्टनरची उपेक्षा केली जाते आणि नात्याच्या अंताचे हेच कारण ठरते.


#3. रिलेशनशीपचा सुरुवातीचा काळ हा मोहरुन टाकणारा असतो. त्यामुळे फोनवर तासंतास गोड गोड गप्पा होतात. मात्र नंतर फोन आल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. फोन न उचलणे, कॉल बॅक न करणे हे वादाचे कारण बनते. आणि याची वाटचाल नात्याच्या अंताकडे होते.


#4. अनेकांना पार्टनरच्या बाबतीत असुरक्षित वाटते. जेव्हा कधी ते इतरांशी बोलतात तेव्हा संशयाच्या नजरेने त्यांच्याकडे पाहिले जाते. हा विश्वासाचा अभाव नाते संपुष्टात आणण्यास कारणीभूत ठरतो.


#5. जर तुम्ही गर्लफ्रेंडला तिने घातलेल्या कपड्यांवरु सारखे बोलत असाल तर तुमची ही सवय ताबडतोब बदला. ब्रेकअप होण्याचे हे मोठे कारण आहे.


#6. अनेकजण सोशल मीडियावर पार्टनरची जासुसी करतात. हे देखील ब्रेकअपचे कारण ठरु शकते.