Hair Care Tips: नारळ दुधाने केसांची चांगली वाढ, अशा प्रकारे करा वापर
Coconut Milk For Hair: नारळाच्या दुधाला चांगली चव सते. पण तुम्हाला माहीत आहे का, नारळाच्या दुधाचा वापर केल्याने केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते.
मुंबई : Coconut Milk For Hair: नारळाच्या दुधाला चांगली चव सते. पण तुम्हाला माहीत आहे का, नारळाच्या दुधाचा वापर केल्याने केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते. नारळाच्या दुधात प्रथिने, सोडियम कॅल्शियमसारखे घटक असतात, जे टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे केस अधिक मजबूत होतात. नारळाचे दूध कसे वापरावे आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घ्या.
केसांसाठी नारळाच्या दुधाचे फायदे
हेअर मास्क म्हणून नारळाचे दूध महत्वाचे आहे. नारळ दूध केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. नारळाच्या दुधाचा हेअर मास्क बनवण्यासाठी, दूध पाव लिटर घ्या आणि ते गरम करा. दूध थोडे कोमट झाल्यावर ते थेट टाळूवर लावा आणि 10 मिनिटे मसाज करा. दूध तुमच्या केसांमध्ये कंडिशनरसारखे काम करते. त्याचवेळी, सुमारे एक तासानंतर केस शॅम्पूने धुवा. तुम्ही आठवड्यातून एकदा हे करg शकता.
नारळाचे दूध आणि लिंबू
नारळाचे दूध आणि लिंबू मिसळून केसांमध्ये लावल्यास ते केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हा पॅक बनवण्यासाठी 4 चमचे नारळाच्या दुधात 2 चमचे लिंबाचा रस मिसळा, आता फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर केसांना लावा आणि 40 मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर केस धुवा.
नारळाचे दूध आणि मध
मध केसांमध्ये कंडिशनर म्हणून काम करते. हे तुमच्या केसांना मॉयस्चराइज करते. केसांना लावण्यासाठी 6 चमचे नारळाचे दूध घ्या आणि त्यात 3 चमचे मध मिसळा. आता हा पॅक केसांना लावा आणि चांगला मसाज करा. आता 30 मिनिटांनी केस चांगले धुवा. यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)