Hair Care Tips : डोक्यावरील पिंपल्सचा कसा करा उपाय, मिळेल मोठा रिलीफ..
आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
Home Remedies To Treat Scalp Pimples: आपण अनेकदा चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्सबद्दल तक्रार करत असतो पण तुम्हाला माहितेय का? डोक्यात ही पिंपल्स येतात. पिंपल्समुळे जसं चेहऱ्यावरील सौंदर्य खराब होते तसेच डोक्यातही अनेक समस्या व्हायला सुरुवात होते. (Hair Care Tips How to solve pimples on the head you will get great relief nz)
अनेकदा गरमीमुळे आपल्याला या समस्यांना सामोरे जावे लागते. किमान आठवड्यात 2 ते 3 वेळा केस धुणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे केसांमध्ये खरडा होत नाही. केसांच्या गळतीचे प्रमाण ही कमी होते. केसांची योग्य निगा राखली गेली पाहिजे. वेळीच लक्ष न घातल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
आणखी वाचा - Parenting Tips : तुमच्या मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतंय ना.. मग फॉलो करा या टीप्स
ही समस्या पोर्स ब्लॉक झाल्यामुळे किंवा बॅक्टेरिया किंवा फंगल इंफेक्शनमुळे होण्याची शक्यता जास्त असते. यालाच स्काल्पचे एक्ने असेही म्हणतात. अशावेळेस घाबरण्याचे कारण नाही तुम्ही महागड्या प्रोडक्टसचा वापर व करता घरगुती उपायांनी ही या समस्येवर मात करु शकता. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
टोमॅटोचा रस - टोमॅटोचा रस आपल्या टाळूच्या पीएच पातळीला संतुलित करण्याचे काम करतो. त्यामुळे पिंपल्स हळूहळू कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी प्रथम एका वाटीत टोमॅटोचा रस काढा. डोक्याच्या पिंपल्सवर हलकेच लावा. एका तासानंतर आपले डोके कोणत्याही माइल्ड शॅम्पूने धुवा.
मेथी - मेथी वापरण्यासाठी भिजवलेल्या मेथीचे दाण्यांची पेस्ट करून घ्या. नंतर ते टाळूवर लावा आणि ३० मिनिटे असेच राहू द्या. यानंतर आपले केस शॅम्पूने धुवा.
कोरफड आणि पुदिना - पुदिन्याची 20 पाने पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. त्यानंतर एलोवेरा जेल घ्या आणि पुदिन्याच्या द्रावणात मिक्स करा. हे रोज स्काल्पवर लावल्याने चांगला फायदा होतो.
आणखी वाचा - IRCTC Goa Package : भाई चलो गोवा! IRCTC ने तुमच्यासाठी आणलंय भन्नाट गोवा पॅकेज, आताच जाणून घ्या...
अॅपल सीडर व्हिनेगर - अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात जे पिंपल्समुळे होणारे बॅक्टेरिया आणि टाळूतील तेल स्वच्छ करतात. व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा आणि २० मिनिटे राहू द्या. काही वेळानंतर आपले डोके धुवा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)