Hair straightener cancer : तुम्ही केस सरळ करण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट (Hair straightening product) वापरत असाल तर सावधान. केस सरळ करण्यासाठी केमिकल प्रोडक्ट वापरणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. कारण हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समुळे कॅन्सरचा (Hair straightener cancer) धोका आहे असं संशोधन समोर आलंय. इतकच नाही तर प्लास्टिकमधली केमिकल्स या प्रॉडक्टमध्ये असल्याचंही या संशोधनात म्हटलंय. 


हेअर स्ट्रेटनिंगमुळे कॅन्सर? 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    या प्रॉडक्ट्समध्ये Bisphenol A आणि फॉर्मेल्डिहाईड ही केमिकल असतात

  • दोन्ही प्रॉडक्ट्स कॅन्सरसाठी जबाबदार असतात

  • ही दोन्ही केमिकल्स प्लास्टिकमध्येही आढळून येतात

  • ही प्रॉडक्ट्स वापरणा-या महिलांमध्ये कॅन्सरचा धोका 4.05% इतका वाढतो



अमेरिकेत हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्स तयार करणा-या तीन मोठ्या कंपन्यांविरोधात कोर्टात केस सुरु आहेत. या सगळ्या कंपन्या भारतात आपली उत्पादनं विकतात. इतकच नाही तर यापैकी दोन कंपनी भारतीय आहेत. आतापर्यंत हेअर ट्रान्सप्लंटमुळे कॅन्सरचा धोका असल्याचं समोर आलं होतं. पण आता हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्समुळेही कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधन झालंय.. त्यामुळे हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्स वापरताना सावधान.


केसांसाठी केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर टाळावा परमनंट हेयर स्ट्रेटनिंगसाठी केमिकलंचा अधिक वापर केल्याने कॅन्सरचा धोका संभवतो. यावर अजूनही रिसर्च सुरु आहे. तरीदेखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केसांना केमिकल्स वापरणं टाळायला हवं.