मुंबई : नितळ, चमकदार त्वचेसाठी आपण काय नाही करत? बाजारातील विविध महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. पण सौंदर्याचे काही उपाय आपल्याला स्वयंपाकघरात सापडतात. त्यातील एक परिणामकारक उपाय म्हणजे हळद. बहुगुणी हळद आरोग्यदायी असण्याबरोबरच सौंदर्यवर्धकही आहे. हळद त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. विविध पदार्थांमध्ये हळद मिक्स करुन बनवलेले पॅक त्वचेसाठी उत्तम ठरतात. तर पाहुया त्वचा नितळ, सुंदर करण्यासाठी हळद कशी वापरावी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. बेसन आणि हळद एकत्र करुन तुम्ही त्याचा स्क्रबप्रमाणे वापर करु शकता. त्यामुळे त्वचा उजळ आणि मुलायम होईल.


२. लिंबाच्या रसात ब्लिचिंगचे गुणधर्म असतात. तर हळदीमुळे त्वचा उजळते. त्यामुळे हळदीत लिंबाचा रस मिक्स करुन त्वचेवर लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊन त्वचेचा पोत सुधारेल.


३. हळदीत दूध घालून चेहऱ्यावर लावल्यास फ्री रेडिकल्स कमी होतात. त्यासाठी हळदीत कच्चे दूध घालून मिश्रण बनवा आणि ते चेहऱ्यावर, मानेवर लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. नंतर त्वचेत झालेला बदल स्वतः अनुभवा.


४. हळदीत थोडी मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्वचा हेल्दी, कोमल आणि उजळ होईल.


५. हळदीत आणि खोबरेल तेलात अंटी फंगल गुणधर्म असतात. त्याचबरोबर खोबरेल तेल मॉश्चराईजिंगचेही काम करते. हळद आणि खोबरेल तेल एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.


६. ऑलिव्ह आईलमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची लवचिकता टिकून राहते. त्याचबरोबर त्वचा मऊ मुलायम होते.


७. हळदीत लिंबाचा रस, मध मिक्स करुन लावल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. त्यासाठी चमचाभर हळद, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.