Hard-Boiled vs Soft-Boiled Eggs: अंड्यात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. मिनरल्स, व्हिटॅमिन आणि प्रोटीनसारखे अनेक तत्वे यात असतात. त्यामुळं आहारात अंड्याचा समावेश करावा, असं नेहमी सांगितलं जाते. अंड्याचे शरीराला अनेक लाभ होतात. तुम्ही जिममध्ये जात असाल तर जिम ट्रेनरदेखील अंड्याचा आहारात समावेश करण्यास सांगतात. कारण यामुळं शरीराला उर्जा मिळते. पण तुम्हाला माहित्येय का अंड उकडण्याच्याही दोन पद्धती आहेत. काही जणांना हार्ड बॉइल्ड एग आवडते तर काहींना सॉफ्ट बॉइल्ड एग आवडतात. पण या दोन्ही पद्धतीतील आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्ड बॉइल आणि सॉफ्ट बॉइल एग यातील फरक जाणून घेऊया. 


हार्ड बॉइल एग


सर्वसाधारण पणे हार्ड बॉइल एग म्हणून पूर्णपणे शिजलेले अंड. अंड्याच्या आतील बलक आणि बाहेरील पांढरा भाग हा पूर्णपणे शिजलेला असतो. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हार्ड बॉइल एग म्हणजे पूर्ण उकडवलेले अंड. हे अंड तुम्ही असंच खावू शकता किंवा सलाडमध्येही कापून टाकू शकता. अंड पूर्णपणे उकडवण्यासाठी खूप वेळ लागतो. 


सॉफ्ट बॉइल एग 


सॉफ्ट बॉइल एग म्हणजे अर्धकच्च उकडलेले अडं. या पद्धतीत अंड्याचा पांढरा भाग पूर्णपणे उकडलेला असतो तर आतील पिवळा बलक हा अर्धवट कच्चा म्हणजेच सॉफ्ट असतो. सॉफ्ट बॉइल एगसाठी खूप कमी वेळ लागतो. तसंच, ब्रेकफास्ट किंवा एखाद्या सूपमध्ये अंड वापरायचे असेल तर मोठ्या रेस्तराँमध्ये ही सॉफ्ट बॉइल एग ही पद्धत वापरली जाते. 


हार्ड बॉइल एग आणि सॉफ्ट बॉइल एग यांची तुलना करायची झाल्यास त्यातील मुख्य फरक म्हणजे अंड्याचा पांढरा भाग आणि अंड्यातील पिवळा बलक किती शिजवले जातात यावरुन ठरतो. 


आरोग्यासाठी कोणते फायदेशीर


हार्ड बॉइल एग आणि सॉफ्ट बॉइल एग यापैकी आरोग्यासाठी कोणते फायदेशीर आहे हे पाहायला गेल्यास या दोन्ही पद्धतीत पोषण हा एक आवश्यक घटक आहे. या दोन्ही पद्धतीने अंड शिजवतावा जीवनसत्व आणि खनिजे दोन्हींना काहीच धोका नसतो. मात्र, सॉफ्ट बॉइल एग खाल्ल्यास आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. 


सॉफ्ट बॉइल एगमुळं निर्माण होणाऱ्या समस्या


सॉफ्ट बॉइल एगमुळं सालमोनेला (salmonella) चा धोका निर्माण होऊ शकतो. हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. जेव्हा तुम्ही अंडे सॉफ्ट बॉइल करता तेव्हा सालमोनेलाचा धोका जास्त असतो. कारण जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा अंड्यातील पिवळे बलक अर्धे कच्चे असते. त्यामुळं ज्यांची रोगप्रतिकाशक्ती कमकुवत आहे. त्यांनी ही पद्धत टाळलेलीच बरी. 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या, पाच वर्षांपेक्षा लहान, रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली किंवा गरोदर असलेल्यांना स्त्रीयांना अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो.