मुंबई : तुमच्या मुलांना (Children) शांत ठेवण्यासाठी जर तुम्ही त्यांच्या हातात  मोबाईल फोन ( Mobile Phones) देत असाल तर वेळीच सावध व्हा... कारण आता एक असा रिसर्च समोर आलाय की, ज्यामुळे लहान मुलांना गॅझेट्स देणाऱ्या पालकांची झोप उडू शकते. हा स्पेशल रिपोर्ट... (Harmful Effects of Mobile Phones on Children)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांनो, ही धोक्याची घंटा आहे हे समजून जा. कारण मोबाईलमुळे मुलं आणखी चिडखोर होत असल्याचे एका सर्वेमधून समोर आले आहे. दोन ते तीन वर्षांच्या कोवळ्या वयाच्या मुलांच्या हातात स्मार्ट फोन देणे धोकादायक ठरत आहे. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी याबाबत रिसर्च करत अहवाल दिला आहे. स्मार्टफोनवर कार्टून पाहणाऱ्या लहान मुलांच्या वर्तनाचा तसेच पालक किती वेळ मुलांना स्मार्टफोन वापरायला देतात याचा अभ्यास करण्यात आला.


मुलांना मोबाईल दिल्यानंतर आधी ती शांत झाली. मात्र थोड्या वेळाने मोबाईल काढून घेतल्यानंतर त्यांच्या रागाचा पारा चढला.
असं वारंवार झाल्यास मुलं जास्त रागीट आणि क्रूर बनतात, असं या अभ्यासात आढळले. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पालकांनी आपल्या मुलांना गॅझेट्सपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी ते आपल्या रागावर नियंत्रण आणू शकतील. त्यासाठी पालकांनाही या अहवालातून काही टीप्स देण्यात आल्यात.


असं करणे टाळा?


- लहान मुलांना मोबाईलवर ऑडिओ, व्हिडिओ दाखवणं टाळा
- 18 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना गॅझेट्स देऊ नका
- 2 ते 5 वर्षांच्या मुलांना दिवसभरात तासाहून अधिक काळ गॅझेट्स वापरू देऊ नका
- मुलं कोणते व्हिडिओ पाहतात, यावर पालकांनी लक्ष ठेवा
- जेवताना, प्रवास करताना मुलांना व्हिडिओ दाखवणs टाळा
 
क्षणभराचा विरंगुळा म्हणून पालक मुलांच्या हाती मोबाईल देतात. पण मग हा भस्मासूर मुलांना आणि पालकांनाच सळो की पळो करून सोडते. तेव्हा आपल्या मुलांना घातक सवयी लागणार नाहीत, याची काळजी पालकांनो तुम्हीच घ्या.