मुंबई : आपल्यापैकी अनेकजण असे असतील ज्यांना पेट्रोलचा वास प्रचंड आवडत असेल. कुठल्याही पेट्रोल पंपजवळून जात असताना किंवा तिथं थांबलेलं असताना पेट्रोलचा वास आला, की हीच मंडळी डोळे बंद करन शक्य तितका हा वास म्हणा किंवा त्यांच्यासाठीचा सुवास म्हणा... त्याचा आनंद घेताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात ही एक अतिशय वाईट सवय आहे. स्नीफिंग पेट्रोल (Sniffing Petrol) किंवा स्नीफिंग गैसोलीन (Sniffing Gasoline) म्हणूनही या सवयीकडे पाहिलं जातं. 


पेट्रोलचा वास घेतल्यामुळं एक प्रकारचा नशा होतो, जो आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. कारण याचा थेट परिणाम आपल्या सेंट्रल नर्व्ह सिस्टीमवर होत असतो.          


आजच सोडा ही सवय 
स्नीफिंग गैसोलीन (Sniffing Gasoline) या सवयीचा किंवा सतत पेट्रोलचा वास घेण्याच्या सवयीचा आपल्या मेंदूवर थेट परिणाम होत असतो. यामध्ये असणारं lead अनेक आजार बळावण्यास कारणीभूत ठरतं. 


अनेकदा याचे परिणाम मृत्यूही ओढावू शकतात. सध्याच्या घडीला तरुणाईध्ये ही व्यसनवजा सवय अधिक वाढत आहे, जी धोक्याची बाब ठरत आहे. कारण अमली पदार्थाना पर्याय म्हणूनही याकडे पाहिलं जातं. 


पेट्रोलचा वास घेतल्यामुळे होणारे नुकसान 
- श्वास घेण्यास त्रास 
- घसा दुखणे किंवा चुरचुरणे
- विष्ठेवाटे रक्तस्त्राव 
- चक्कर येणं
- सतत चिडचीड 
- कमी भूक लागणं 
- झोप कमी येणं
- नैराश्य 
- शुद्ध हरपणं
- तीव्र डोकेदुखी
- थकवा
- पोटदुखी
- दृष्टी कमकुवत होणं
- रक्ताची किंवा बिनरक्ताची उलटी 


कशी सोडवाल ही वाईट सवय? 
- पेट्रोलचा वास आवडणाऱ्या आप्तजनांवर नजर ठेवा. 
- पेट्रोल पंपवर असतेवेळी मास्क वापरा. 
- सदर गोष्टीकडे गांभीर्यानं पाहत त्याबाबत जागरुकता पसरवा


वास न येणारं पेट्रोल उत्तम पर्याय 
लोकांमध्ये असणाऱ्या या व्यसनाला पाहता वास न येणाऱ्या पेट्रोलचाही शोध लावण्यात आला होता. ओपल नामक वास न येणाऱ्या या पेट्रोलमध्ये lead चं प्रमाण अतिशय कमी असतं. 


परराष्ट्रांमध्ये या पेट्रोलचा वापर सुरु आहे. पण, भारतात मात्र हे पर्व अद्याप सुरु झालेलं नाही.