मुंबई : आजकाल फिटनेस, आरोग्याचे महत्त्व सर्वांना पटायला लागले आहे. त्यामुळे आरोग्याविषयी प्रत्येकजण सजग झाले आहेत. आपल्याकडे निसर्गाने दिलेल्या इतक्या गोष्टी आहेत की त्याच्या जोरावर आपण एकदम फिट राहू शकतो. पण अनेकदा आपल्याला त्याची जाणीव, माहिती नसते. आज आपण अशाच एक नैसर्गिक पण अतिशय फायदेशीर पदार्थाबद्दल माहिती घेऊया. हा पदार्थ म्हणजे तुमच्या आमच्या घरात असलेली मध. मधाचे एक-दोन नव्हे तर अनेक फायदे आहेत. म्हणून दिवसातून एक चमचा मध अवश्य खा...


अॅंटीऑक्सिडेंट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधात अॅंटीऑक्सिडेंट असतात. त्यामुळे शरीरातील विषद्रव्य बाहेर पडण्यास मदत होते. त्याचबरोबर मधात व्हिटॉमिन्स आणि प्रोटीन्सही असतात. मधातून शरीराला नैसर्गिक स्वरुपातील ग्लुकोज मिळते.


त्वचा चमकदार होईल


मध खाल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. मधात अॅँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात जे चेहरा चमकदार करण्यास मदत करतात. त्याचबरोबर त्वचा मुलायम आणि नितळ होते. मध चेहऱ्याला लावल्याने त्वचेला फायदा होतो.


नैसर्गिक गोडवा


वजन कमी करण्यासाठी साखर कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यावेळेस साखरेऐवजी मध कामी येते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि वजनही वाढत नाही. 


व्हिटॉमिन्स आणि मिनरल्सचा स्त्रोत


मधात व्हिटॉमिन बी६, व्हिटॉमिन सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मिनरल्स असतात. यामुळे शरीराचे मेटॉबोलिझम सुधारते आणि सर्व पोषकघटक शरीराला मिळतात.


कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी


मधात कोलेस्ट्रॉल अजिबात नसल्याने बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. मधाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलशी लढण्यास मदत होते.  


पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त


मध पोटासाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरते. दररोज रिकाम्या पोटी मध खाल्याने पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर इंफेक्शनपासूनही संरक्षण होते.