मुंबई : रोजच्या जीवनात आपल्याला अशा काही सवयी असतात, ज्यामागची कारणं उलगडली असता आपण पुरते भारावून जातो. या सवयी किंवा अशा कैक कृतींची आपण दररोज पुनरावृत्ती करतो. पण, जेव्हा त्यामागचा हेतू नकळत समोर येतो तेव्हा मात्र लहानशा गोष्टींनाही दैनंदिन जीवनात किती महत्त्वं आहे याचा अगदी सहज अंदाज लावता येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही शिंकल्यानंतर शेजारी असणाऱ्या कोणी कधी Bless You असं म्हटलंय का? दुसऱ्यांपेक्षा स्वत:चं उदाहरण घ्या. कोणीही शिंकल्यावर तुम्ही Bless You म्हणता का? म्हणतही असाल. पण, असं का म्हणतात हा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी? 


Fordham University मधील इतिहासाचे प्राध्यापक W David Myers यांच्या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार शिंक येणं म्हणजे देवाकडून मिळणारा इशारा असतो. इसवीसन 590 मध्ये जेव्हा प्लेगची साथ आली होती तेव्हा Pope Gregory the Great यांच्यानुसार शिंक येणं म्हणजे प्लेगचं प्राथमिक लक्षण होतं. परिणामी ख्रिस्त धर्मियांना उद्देशून त्यांनी कोणीही शिंकल्यास त्यावर आशीर्वाद देत व्यक्त होण्याचा आदेशवजा सल्ला दिला होता, असा संदर्भ समोर आला. 


बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा तंत्रज्ञानाचा शिरकावही झाला नव्हता, तेव्हाच्या काळात असं समजलं जात होतं की शिंकण्यामुळं शरीरात बऱ्याच नकारात्मक शक्ती प्रवेश करतात. परिणामी “God bless you” असं म्हटल्यास या नकारात्मक शक्ती शरीरापासून दूर राहतात. 


शिंक येण्याची कैक कारणं. पण, पुरातन काळापासूनच शिंकल्यानंतर “God bless you” किंवा तत्सम शब्द म्हणण्याची पद्धत आहे. रोमन संस्कृतीत शिंक आल्यास "Jupiter preserve you" किंवा "Salve" असं म्हणतात. उत्तम आरोग्य लाभो, असाच याचा अर्थ. व्हिएतनाममध्ये शिंक आल्यास 'Rica and Salt' असं म्हणतात. तेथील संस्कृतीमध्ये तांदूळ/ भात आणि मीठ या दोन गोष्टी मनुष्याच्या आयुष्यात अतीव महत्त्वाच्या असतात असा समज आहे, म्हणून या शब्दांचा उच्चार केला जातो. 


आहे की नाही कमाल? त्यामुळे यापुढे कोणीही शिंकल्यास तुम्ही Bless You म्हणायला विसरु नका.