मुंबई : मूळव्याध हा आजच्या काळात एक सामान्य, पण गंभीर आजार झाला आहे, ज्यापासून सुटका करणे सोपे नाही. त्यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कधी कधी त्याचा त्रास असह्य होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळव्याधच्या समस्येमुळे रुग्णांना केवळ स्टूलमध्ये रक्त येण्याची समस्या आणि तीव्र वेदना होतात. तसेच रुग्णाला बसण्यास देखील खूप त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, यापासून मुक्त होण्यासाठी, औषधांव्यतिरिक्त, योग्य आहार आणि दिनचर्या पाळणे खूप महत्वाचे आहे जेणेकरुन होणार्‍या समस्या टाळता येतील. यासोबतच तुम्हाला काही गोष्टी टाळाव्या लागतील जेणेकरून समस्या आणखी वाढू नये. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मूळव्याधची समस्या असेल तर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.


तेलकट आणि मसालेदार अन्न


जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न मूळव्याध रुग्णांसाठी अत्यंत हानिकारक असू शकते. असे अन्न टाळण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास होत असेल तर मसालेदार अन्न अजिबात खाऊ नका. यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.


मिरची 


मुळव्याध असलेल्या व्यक्तीने मिरचीचे सेवन करू नये, मग ती हिरवी मिरची असो किंवा लाल मिरची. कारण याच्या सेवनाने वेदना आणि जळजळ होण्याची समस्या वाढू शकते.


मांस, मासे आणि अंडी टाळा


मूळव्याध असलेल्या रुग्णांनी मांस, मासे आणि अंडी खाणे टाळावे. कारण या गोष्टी गरम असतात आणि त्या पचायलाही थोडं कठीण असतात. त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहणे चांगले.


सुपारी, गुटखा, सिगारेट, पान मसाला खाणे टाळावे


अशाच प्रकारे या गोष्टींचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचे सेवन केल्याने कर्करोग होऊ शकतो. तसेच, यामुळे मूळव्याध रुग्णांच्या वेदना वाढू शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचे सेवन टाळा.


राजमा, मसूर आणि सोयाबीनचे सेवन करू नका


मूळव्याधच्या रुग्णांसाठीही या गोष्टींचे सेवन धोकादायक आहे. त्यामुळे जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होत असेल तर या गोष्टींपासून दूर राहा.


बाहेरचे खाणे टाळा


मूळव्याधीच्या रुग्णांनी बाहेरचे जेवण टाळावे कारण बाहेरचे जेवण करताना मीठ किंवा मिरचीची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे घरी बनवलेले अन्न खा.


तूप


तसे, तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण काही वेळा याच्या सेवनाने मूळव्याध रुग्णांची समस्या वाढू शकते. त्यामुळे तुपाचे सेवन तेव्हाच करा जेव्हा ते तुम्हाला अनुकूल वाटत असेल.