सफरचंदाला सारखं दिसतं हे फळं; परंतु खाण्याचा प्रयत्न मात्र कधीच करू नका अन्यथा...
आम्ही तुम्हाला याच फळाबद्दल सांगणार आहोत.
Beaware of this Fruit: सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. त्याचबरोबर आपल्याला असंही सांगितलं जातं की सफरचंद खाल्यानं आपण डॉक्टरांपासून दूर राहतो. परंतु असं एक सफरचंद आहे जे खाणं तुम्हाला कदाचित महागात पडेल. (health advice dont ever try to eat this fruit otherwise you will face its concequences)
घाबरू नका हा कुठला सफरचंद नाही परंतु सफरचंदासारखाच दिसणारं हे फळ तुम्हाला संभ्रमित करू शकतो. आम्ही तुम्हाला याच फळाबद्दल सांगणार आहोत.
विषारी झाडाबद्दल ऐकलं असेलच आम्ही तुम्हाला अशा एका विषारी झाडाबद्दल सांगणार आहोत. या झाडाचे नाव 'मैशीनील' असे आहे. हे फ्लोरिडा आणि कॅरिबियन समुद्राच्या किनारपट्टीवर आढळते. त्याच्या संपर्कात येताच माणसाच्या शरीरावर फोड यायला सुरवात होतात. या झाडाला फळ देखील येतात जे दिसायला सफरचंदा सारखे दिसतात.
तज्ञांचे म्हणण्याप्रमाणे या फळामुळं मृत्यूही उद्भवू शकतो. असे म्हटले जाते की ख्रिस्तोफर कोलंबसने 'मैशीनील'च्या फळाला मृत्यूचा छोटा सफरचंद असे नाव दिले. हे इतके विषारी असते की या फळाचा रसही जरी तुमच्या डोळ्यात गेला तरी त्यानं माणूस आंधळा होऊ शकतो. 'मैशीनील' या झाडाची उंची सुमारे 50 फूट आहे.
अशी कथा आहे की निकोला एच स्ट्रिकलँड नावाच्या शास्त्रज्ञांनं आणि त्यांच्या काही मित्रांनी एकदा टोबॅगोच्या कॅरिबियन बेटाच्या किनाऱ्यावर हे फळ खाल्ले होते जे फारच कडू होते.त्यांनी सांगितले की या झाडाचे फळ खाल्ल्यानंतर त्याला जळजळ होऊ लागली आणि शरीराला सूज येऊ लागली. मात्र तातडीने त्यांनी उपचार केल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारली.
लोकांना त्या झाडापासून लांब ठेवण्यासाठी आणि सावधान करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. या झाडाची पाने अंडाकृती आणि चमकदार आहेत आणि या झाडाचा सर्वात विषारी भाग म्हणजे याचे फळं आहे. ज्यामुळे हे झाड लोकांना त्याच्याकडे आकर्षीत करते. या झाडांची मुळं त्यांच्या सभोवतालातील मातीला पकडून ठेवतात. यामुळेच या झाडाला त्या ठिकाणावरुन काढले जात नाही.
या झाडाचं लाकूड हे टिकाऊ आहे. परंतु यासाठी या झाडाला अत्यंत काळजीपूर्वक कापले जाते. त्याचबरोबर यातील विषारी रस काढून टाकण्यासाठी कापल्यानंतर या झाडाची लाकडं उन्हात बराच काळ वाळवली जातात. त्यानंतर या लाकडांचा उपयोग फर्नीचर बनवण्यासाठी केला जातो.