मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीत मोहरीचे तेल आर्वजून वापरले जाते. आपली खाद्यसंस्कृती आरोग्यदायी असल्याने मोहरीचे तेल आरोग्यदायी आहेच. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धकही आहे. यातील तत्त्वांमुळे त्वचा, शरीराचे पोषण होते. त्याचबरोबर त्वचा, केसांसंबंधितच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया मोहरीच्या तेलाचे सौंदर्यवर्धक फायदे...


रॅशेसपासून सुटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहरीच्या तेलाने रॅशेसपासून सुटका होते. यात अंटी फंगल आणि अंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवर होण्यारे रॅशेस दूर होतात. यासाठी मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून त्वचेवर मसाज करा.


सन्सक्रीम


उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण सन्सक्रीमचा वापर करतो. पण अनेकांना हे ठाऊक नाही की, सनबर्नच्या समस्येपासून वाचण्यासाठी मोहरीच्या तेलाशिवाय दुसरा परिणामकारक उपाय नाही. मोहरीच्या तेलात व्हिटॉमिन्स ई असल्याने सुर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. सुरकुत्यांवर परिणामकारक ठरते.


त्वचा उजळण्यासाठी


त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म मोहरीच्या तेलात असतात. त्यामुळे त्वचेला कोणतेही हानी होत नाही. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि त्वचा उजळेल.


केसांच्या आरोग्यासाठी


केस रुक्ष होणे, खाज, कोंडा यांसारख्या केसांच्या समस्येवर मोहरीचे तेल गुणकारी ठरते. आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करुन त्याने केसांना मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने केस सौम्य शॅम्पूने धुवा. केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल व केस चमकदार होतील.