मुंबई : जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. 


पाहा काय आहेत याचे फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. सैंधव मीठामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल कऱण्यास मदत होते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.


२. तणाव कमी करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. सैंधव मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.


३. अंगदुखी कमी करण्यासही सैंधव मिठाचा वापर होतो. 


४. सायनसचा त्रास असलेल्यांनी सैंधव मीठाचे सेवन करणे गरजेचे असते. मुतखड्याचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करुन प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो. 


५. अस्थमा, डायबेटीज आणि आर्थराइटिसच्या रुग्णांनी नियमितपणे सैंधव मिठाचे सेवन करावे.