मुंबई : चेहरा तसेच केसांशी संबंधित समस्यांवर अनेकदा आपल्या घरातील उपाय कामी येतात. नारळाचे तेल आणि लिंबाच्या मिश्रणाचे अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे फायदे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डागांवर गुणकारी - दोन मोठे चमचे नारळाच्या तेलात दोन लहान चमचे लिंबू रस मिसळा. या मिश्रणाने दोन मिनिटे मसाज कराआणि पाच मिनिटानंतर चेहरा धुवा.


मोठ्या छिद्रांसाठी - आठवड्यातून तीन वेळा चेहरा धुतल्यानंतर एक चमचा नारळाच्या तेलात दोन लहान चमचे लिंबूचा रस मिसळा. कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 


लांब केसांसाठी - आठवड्यातून दोन ते तीन वेळा दोन चमचे नारळाच्या तेलात एक चमचा लिंबूचा रस मिसळून स्काल्पवर लावा. 


उजळ त्वचेसाठी - दोन लहान चमचे नारळाच्या तेलात एक लहान चमचा लिंबूचा रस मिसळा. कापसाच्या मदतीने चेहरा आणि मानेवर लावा. 


केसातील कोंड्यासाठी - आठवड्यातून दोन वेळा आंघोळ कऱण्याच्या १५ मिनिटेआधी दोन छोटे चमचे नारळाच्या तेलात दोन मोठे चमचे लिंबाचा रस मिसळून स्काल्पला मसाज करा आणि नंतर केस धुवा.