मुंबई : आधुनिक जीवनशैलीमध्ये आता मातीची भांडी हळूहळू कालबाह्य होत चाललीयेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मातीचा तवा मेट्रो शहरांसह लहान शहरांतील घरांमध्येही पाहायला मिळतोय. जुन्या लोकांच्या मते मातीच्या भांड्यातील जेवण जेवल्याने अनेक फायदे होतात. आयुर्वेदात असं सांगितल गेलंय की जेवण कधीही धीमी आचेवर हळूहळू शिजवले गेले पाहिजे. मात्र आता स्टील अथवा अॅल्युमिनियमच्या भांड्यात हे शक्य होत नाही. 


गॅसच्या समस्येपासून सुटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मातीच्या तव्यावर बनलेल्या पोळ्या खाल्ल्याने गॅसची समस्या दूर होते. जर तुम्हाला दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करण्यामुळे गॅसची समस्या जाणवते तर तुम्ही मातीच्या तव्यावर बनवलेल्या पोळ्या खा. 


स्वादिष्ट आणि पौष्टिक


मातीच्या तव्यावर बनलेल्या पोळ्या स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात. मातीचे तत्व पोळ्यांमध्ये शोषले जाते यामुळे त्याची पौष्टिकता अधिक वाढते. 


बद्धकोष्ठतेपासून सुटका


सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या साधारण झालीये. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय त्यांनी मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाल्ल्याने त्रास दूर होतो.


मातीचा तवाच का? 


असं म्हटलं जात की मातीच्या तव्यावर पोळी बनवल्याने त्यामधील एकही पोषकतत्व नष्ट होत नाही. अॅल्युमिनियमच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने त्यातील ८७ टक्के पोषकतत्वे कमी हतोता. पितळेच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने ७ टक्के पोषकतत्वे कमी होतात. केवळ मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थांमध्ये १०० टक्के पोषकतत्वे कायम राहतात.


या गोष्टींची घ्या काळजी


मातीचा तवा वापरताना धीमी आचेवर वापर करा. तसेच हा तवा पाण्याच्या संपर्कात येता कामा नये. पोळ्या बनवून झाल्यानंतर मातीचा तवा कपड्याने स्वच्छ करा.