दुखण्यावर पॅरासिटामोलपेक्षा अधिक गुणकारी आहे हळद, जाणून घ्या फायदे
शरीराच्या अनेकाविध दुखण्यांवर आपल्या घरातील उपाय फायदेशीर ठरतात. किचनमध्ये असे काही पदार्थ असतात ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. त्यापैकीच एक म्हणजे हळद.
मुंबई : शरीराच्या अनेकाविध दुखण्यांवर आपल्या घरातील उपाय फायदेशीर ठरतात. किचनमध्ये असे काही पदार्थ असतात ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. त्यापैकीच एक म्हणजे हळद.
सर्वांच्याच घरात आढळणारा मसाल्याचा पदार्थ म्हणजे हळद. शरीराच्या एखाद्या दुखण्यावर आराम मिळवण्यासाठी पॅरासिटामोल अथवा आयबुप्रोफेन गोळी घेतली जाते. मात्र त्याऐवजी हळद नेहमीच फायदेशीर ठरते.
हळदीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत
एखाद्या दुखण्यावर गोळी घेतल्यास त्याचे साईडइफेक्ट होण्याची अधिक भिती असते. मात्र हळदीच्या वापराने कोणतेही नुकसान होत नाही. खेळताना जखम वैगरे झाल्यास हळदीचा वापर केल्यास फायदेशीर ठरतो.
हाडे अथवा स्नायूंच्या दुखापतीवरही हळद गुणकारी
संशोधकांच्या मते हळदीचा वापर हाडे आणि मांसपेशींच्या दुखापतीवरही होतो. हळदीमध्ये करक्युमिन नावाचे तत्व असते जे हाडांसाठी फायदेशीर असते. हळदीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे हृदयरोगाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
हळदीचा वापर तुम्हाला बनवले हेल्दी
गरम दुधात कच्ची हळद मिसळून प्यायल्याने मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. हळदीत अँटीसेप्टीक गुण असतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना जखम झाल्यास ती लवकर भरुन येण्यासाठी हळद गुणकारी ठरते.