बाहेरचाच नव्हे, 99% घरांमध्येही बनतो घातक चहा; माहिती वाचून सवयच सोडून द्याल
Health News : कितीही चांगला चहा बनवणारी व्यक्ती असो, ही माहिती वाचून पायाखालची जमीन सरकेल. चहा पिणं आरोग्यास धोकादायक... पण तुमच्याचत सवयी ठरतात कारणीभूत
Health News : जगभरात चहाप्रेमींमध्ये भारताचा पहिला क्रमांक येतो असं म्हटलं तरी हरकत नाही. कोऱ्या चहापासून अगदी दुधाचा चहा इतकंच काय, तर पिंक टीपर्यंत या चहाचे बहुविध प्रकार भारतात उदयास आले आणि त्याला चहाप्रेमींची तितकीच पसंतीसुद्धा मिळाली. हल्ली मात्र या चहाकडे खलनायकाच्या दृष्टीतून पाहिलं जातं आणि त्यामागं कारण ठरतंय त्या म्हणजे आरोग्याच्या अनेक समस्या.
तज्ज्ञांच्या मते चहामुळं आरोग्याच्या समस्या भेडसावतात कारण, अर्ध्याहून अधिकजणांना हा चहा नेमका कसा बनवायचा हेच ठाऊक नसतं. चहा बनवण्याच्या अनके पद्धती आहेत, यामध्ये एकच सर्वाधिक वापरात असणारी पद्धत म्हणजे चहा पावडर पाण्यात टाकून ती उकळवून घेणं.
बऱ्याचजणांची अशी धारणा आहे, की चहा बराच वेळ उकळल्यानं तिची चव आणखी वाढते. तर, काही मंडळी दुधासोबतच चहा पावडर उकळतात. पण, सवय किती घातक आहे हे तुम्हाला माहितीये का? आहारतज्ज्ञांच्या मते योग्य पद्धतीनं चहा बनवल्यास त्याचा फायदा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो.
वजन कमी करणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं या आणि अशा कारणांसाठी चहा फायद्याची ठरते. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे चहा पावडरमध्ये कॅफिन तत्वं असतात, ज्यामुळं ती अधिकाधिक वेळा उकळणंसुद्धा आरोग्यासाठी घातक ठरतं. चहामध्ये टॅनिनचं प्रमाण अधिक असतं. हा घटक म्हणजे पॉलीफेनोलिक बायोमोलेक्यूल्सचा एक ग्रुप असून तो सहसा भाज्या, फळं, सुकामेवा आणि मद्यामध्ये आढळतो.
हेसुद्धा वाचा : Counting calories: वजन कमी करण्यासाठीही कॅलरीज गरजेच्या; दररोज किती प्रमाणात कॅलरी आवश्यक?
टॅनिन हे मोठे अणू असतात, जे सहसा चहा, कॉफी आणि तत्सम पेयांमध्ये आढळतात. हे अणू प्रोटीन, सेल्यूलोज, स्टार्च आणि मिनरल्सशी एकरुप होऊन त्यांना एकसंध ठेवण्याचं काम करतात, ज्यामुळं शरीरातील लोह शोषून घेण्याची क्षमता कमी होते. चहा अधिक प्रमाणात उकळल्यामुळे त्यात असणारे पोषक तत्वं कमी होऊन अॅसिडीटीला वाव देणारे घटक वाढतात आणि यामुळं कॅन्सरचा धोकाही बळावण्याची शक्यता असते.
चहा नेमका कसा बनवावा?
तज्ज्ञांच्या मते चहा पावडर 2 मिनिटांसाठी गरम पाण्यात उकळल्यास त्यामध्ये असणारे पॉलीफेनोल्स पाण्यास अधिकाधिक प्रमाणात मिसळतात. ज्यामुळं चहा दीर्घकाळ ठेवल्या ती खराब होते. चहा अधिक वेळ उकळून त्यातून कोणताही फायदा मिळत नाही.
- चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम पाणी उकळून घ्या आणि गॅस बंद करा
- आता गरम पाण्यात चहा पावडर मिसळून 3-4 मिनिटं टोपाचं/ किटलीचं झाकण बंद करा.
- आता यामध्ये थोडं दूध आणि आवडीचा गोड पदार्थ मिसळून चहाचा आनंद घ्या.
(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे देण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)