या `३` कारणांसाठी हिरवळीवर अनवाणी चालणे ठरते फायदेशीर!
सकाळी किंवा संध्याकाळी हिरवळीवर अनवाणी (चप्पल, शु न घालता) चालणं आरोग्यासाठी चांगल मानलं जातं.
मुंबई : सकाळी किंवा संध्याकाळी हिरवळीवर अनवाणी (चप्पल, शु न घालता) चालणं आरोग्यासाठी चांगल मानलं जातं. विशेषतः डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे फार उत्तम असतं. पण हिरवळीवर चालण्याने शरीर व मेंदूला इतर अनेक फायदे मिळतात. पाहुया काय आहेत ते...
व्हिटॉमिन डी
हाडांच्या बळकटीसाठी व्हिटॉमिन डी अतिशय आवश्यक असते. सकाळच्या कोवळ्या सुर्यकिरणातून व्हिटॉमिन डी मिळते. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि इतर आजारही ठीक होण्यास मदत होते.
प्रकृतीशी संबंध
नेचरोपॅथीमध्ये चिकित्साही पंचतत्त्वावर आधारीत असते. हिरवळीवर अनवाणी चालल्याने या पंचतत्त्वाशी आपण अगदी सहज जोडले जातो. त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचे चक्र प्रभावित होते. शरीरातील नकारात्मक ऊर्जा नियंत्रित केली जाते आणि आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
शांतता
सकाळच्या ताज्या हवेत हिरणे आरोग्यासाठी लाभदायी ठरते. कारण शरीराला पुरेसा ऑक्सीजन मिळतो व त्यामुळे शरीराची कार्य सुरळीत होण्यास मदत होते. सूर्याच्या ऊर्जेतून व्हिटॉमिन डी प्राप्त होते. त्याचबरोबर मूड सुधारतो. शरीर-मनाला आराम मिळतो. फ्रेश, उत्साही आणि शांत वाटते.