मुंबई : भारताकडून जगाला 'योगाभ्यासा'चा वसा मिळाला आहे. 21 जून हा दिवस सर्वात मोठा दिवस असल्याने या दिवशी जगभरात 'योगादिन' साजरा करण्याची प्रथा जगभरात सुरू झाली आहे. मात्र योगासन करताना दिवसाची सुरूवात ॐ ने केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. 


थायरॉईड रूग्णांसाठी फायदेशीर - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ॐ चा उच्चार केल्याने गळयामध्ये एक विशिष्ट प्रकारचे कंपन होते. यामुळे थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो. 


ताण हलका होतो - 


मनाची चंचलता, भीती कमी करण्यासाठी ॐ चा उच्चार मदत करतो. डोळे बंद करून दीर्घ श्वास घेताना किमान 5 वेळेस चे उच्चारण केल्याने तुमच्यावरील तणाव कमी होण्यास मदत होते. 


हृद्याचे आरोग्य सुधारते  


ॐ च्या उच्चारणामुळे हृद्याचे कार्य सुधारण्यास मदत होते. रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.  


पचनशक्ती सुधारते -


नियमित योगासनं केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेत पडल्यास मदत होते. परिणामी पचनसंस्थेतील बिघाड दूर होतात.  


थकवा दूर होतो - 


थकवा दूर करण्यासाठीदेखील ॐ ची मदत होते. योगासनाच्या सोबतीने ॐ चा उच्चार ताण कमी करण्यास मदत करते. 


निद्रानाश दूर होतो  -


निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी ॐ चा उच्चार मदत करतो. नियमित ॐ च्या साधनेमुळे शरीर आणि मन हलके होते. परिणामी झोप येण्यास मदत होते.