मुंबई :  च्यवनप्राश हे भारतीयांसाठी स्वास्थ्यसुधारक टॉनिक समजले जाते. त्यामधील आयुर्वेदिक घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबत अनेक समस्यांशी सामना करण्यासाठी शरीराला तंदुरुस्त बनवण्यास मदत करतात.


 रोगप्रतिकारशक्ती सुधारते : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

च्यवनप्राशमधील प्रमुख घटक म्हणजे आवळा. आवळ्यातून शरीराला व्हिटामिन सी चा मुबलक पुरवठा होतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. एका अभ्यासाच्या अहवालानुसार, च्यवनप्राशाच्या सेवनाने अ‍ॅलर्जीमुळे होणारा दाह, पेशींना होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते. च्यवनप्राशमुळे रोगप्रतिकारक पेशींचे कार्य सुधारते. यामुळे इंफेक्शनचे प्रमाण कमी होते.


 श्वसनाच्या समस्या कमी करतात : 


च्यवनप्राशमध्ये असलेल्या जटी-बुटी फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत करते. तसेच त्यातील मॉईश्चरचे प्रमाण नियंत्रणात राहते. अस्थमाच्या रुग्णांसाठी च्यवनप्राशचे सेवन करणे स्वास्थ्यकारक ठरते. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते. सोबत जलनेती केल्यास श्वसनविकारावर नियंत्रण मिळवता येते.


 मेंदूचे कार्य सुधारते : 


च्यवनप्राशमध्ये आवळा, ब्राम्ही,बदाम, अश्वगंधा यासारखे आयुर्वेदीक घटक आढळतात. यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. आकलनक्षमता सुधारते. नवीन शिकण्याची क्षमता सुधारते. 


 हृद्याचे कार्य सुधारते : 


खाण्याच्या विचित्र वेळा आणि तणावग्रस्त जीवनशैली यामुळे अनेकांच्या जीवनात ‘कोलेस्ट्रेरॉल’ वाढवणारे अनेक घटक आहारात येतात. परिणामी हृद्यविकार  जडण्याचे प्रमाणही वाढते आहे. मात्र च्यवनप्राश खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. परिणामी रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते.