मुंबई: तुम्ही बारकाईने पाहाल तर अनेक लोक तोंडात च्युइंगम चघळताना तुम्हाला दिसतील. अनेक लोक सवय म्हणून तर अनेक लोक माऊथ फ्रेशनर म्हणून च्युइंगम चघळतात. लहान मुलांसाठी च्युइंगम चघळने हानिकारक ठरते. पण, मोठ्या व्यक्तिंना जर च्युइंगम चघळण्याची सवय असेल तर, ती सवय चांगली आहे. जाणून घ्या च्युइंग चगळण्याचे फायदे....


कॅलरीजच्या प्रमाणात घट...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोकांच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात फॅट असते. त्यामुळे हनुवटी डबल दिसू लागते. तुम्ही जर सतत च्युइंगम चघळत असाल तर, तुमच्या तोंडाची हालचाल सतत होते. त्यामुळे जबड्याला व्यायाम मिळतो. परिणामी चेहऱ्यावरील कॅलरीजचे प्रमाण कमी होते.


दातांच्या पिवळसरपणावर प्रभावी...


जर तुमच्या दातांवर पिवळसरपणा अधिक प्रमाणात असेल तो कमी करण्यासाठी च्युइंगम महत्त्वाची भूमिका बजावतो.


पचनव्यवस्था सुधारते...


सतत च्युइंगम चघळल्याने तोंडावाटे येणाऱ्या दुर्घंधीपासून सूटका होते. तुम्ही जर दररोज च्युइंगम चघळत असाल तर, तुमची पचनव्यवस्थाही सुधारते.