उन्हाळ्यात दररोज प्या एक नारळ पाणी, फायदे ऐकून हैराण व्हाल
उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे फायदे तर तुम्ही ऐकलेच असतील. जर तुम्ही सकाळची सुरुवात नारळपाण्याने करता तर दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटते.
मुंबई : उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे फायदे तर तुम्ही ऐकलेच असतील. जर तुम्ही सकाळची सुरुवात नारळपाण्याने करता तर दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटते. यासोबतच तुमचे शरीर डिहायड्रेशनपासून वाचते. अनेकजण नारळपाण्याचा वापर त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी करतात. नारळपाण्यात अशी काही तत्वे असतात ज्यांचा शरीराला खूप फायदा होतो. प्रत्येक नारळात २०० मिलीलीटरहून अधिक पाणी असते. हे एक लो कॅलरी ड्रिंकही आहे. नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिंड्ट्स, अमिनो अॅसिड, एंझाईम्स, बी कॉम्प्लेक्स व्हिटामिन, व्हिटामिन सी हे गुण असतात. नारळाचे पाणी हे कार्बोहायड्रेटचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे शरीरात उर्जा वाढते. जाणून घ्या नारळपाणी पिण्याचे बहुगुणी फायदे
नारळाच्या पाण्यात कार्बोहायड्रेट असतात. यामुळे शरीरात उर्जा कायम राहते. तसेच हे पाणी प्यायल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.
सकाळी एक्सरसाईज केल्यानंतर नारळ पाणी पिणे शरीरासाठी लाभदायक ठरते. नारळ्याच्या पाण्यात कमी कॅलरी असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यात अनेक प्रकारचे बायोअॅक्टिव्ह एंझाईम असते. नारळपाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते यामुळे भूक कमी लागते.
नारळाच्या पाण्याच्या नियमित सेवनाने हाय ब्लड प्रेशरचा त्रास नियंत्रणात राखला जातो. यातील व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ब्लड प्रेशर नियंत्रित राखण्यास मदत होते. यासोबतच हायपरटेंशन नियंत्रित होते.
अधिकतर डोकेदुखीच्या समस्या वा मायग्रेनच्या समस्या डिहायड्रेशनमुळे होतात. यावेळी नारळाचे पाणी प्यायल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरुन काढली जाते. नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियमही असते. ज्यांना सतत डोकेदुखीचा त्रास होतो त्यांनी नियमितपणे नारळाच्या पाण्याचे सेवन करावे.