तुपाच्या सेवनाने वजन होते कमी...जाणून घ्या फायदे
तूप खाल्ल्याने वजन वाढते अशी साधारण धारणा असते मात्र आयुर्वेदाच्या मते तुपामध्ये अधिक कॅलरीज असतात तसेच यात हाय सॅच्युरेटेड फॅट्स असतात ज्यामुळे पाचन सुधारते.
मुंबई : तूप खाल्ल्याने वजन वाढते अशी साधारण धारणा असते मात्र आयुर्वेदाच्या मते तुपामध्ये अधिक कॅलरीज असतात तसेच यात हाय सॅच्युरेटेड फॅट्स असतात ज्यामुळे पाचन सुधारते.
तुपामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तसेच वजन घटवण्यास मदत होते. गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपामध्ये कोलेस्ट्रॉल नसते ज्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवत नाही. तुपामुळे अनेक समस्या दूर होतात.
देशी तुपाने पाचनशक्ती सुधारतेे
देशी तुपामध्ये Butyric acidची मात्रा अधिक असते. याशिवाय सॅच्युरेटेड फॅट्स असतात. यामुळे ते चांगले पचते.
तुपाने वजन कमी होते
देशी तुपामध्ये Conjugated Linoleic acid असते. हे तत्व शरीरासाठी वजन कमी करण्यास मदत करते. देशी तुपामध्ये शरीरात जमलेले फॅट्स घटवण्यात मदत होते.