सायकल नियमित चालवा, आरोग्यदायी फायदे मिळवा
आपल्यापैकी अनेक जण आरोग्यादायी जीवनासाठी धडपडत असतात. पण...
मुंबई: आपल्यापैकी अनेक जण आरोग्यादायी जीवनासाठी धडपडत असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, अगदी छोट्या छोट्या गोषींतूनही तुम्ही आरोग्यदायी जीवन जगू शकता. जसे की, सायकल चालवणे. तुम्ही जर नियमितपणे सायकल चालवत असाल तर, तुम्ही मिळवू शकता आरोग्यदाई भरपूर फायदे. जाणून घ्या सायकल चालवण्याचे फायदे.
हृदय: नियमित सायकल चालवल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे आपले हृदय मजबूत होते. तुम्ही जर आठवड्यातील ६ दिवस २० मिनिटे दररोज सायकल चालवली तर तुम्हाला हृदयविकार होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.
झोप: ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे. त्यांच्यासाठी सायकलींग हा एक उत्कृष्ठ उपाय आणि व्यायामही आहे. शरीरातील कोर्डिसोल हॉर्मोन्सची मात्रा वाढणे हे निद्रानाशाचे प्रमुख कारण आहे. सायकलींगमुळे यावर प्रचंड परिणाम होतो.
कॅन्सर : फर्निश संशोधकांच्या अभ्यासानुसार नियमितपणे ३० मिनिटे सायकल चालवणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटते.
लठ्ठपणा: जर तुमचे वजन वाढत असेल. तर तुम्ही नियमितपणे सायकल चालवा फायदा होईल.
गर्भावस्था: गरोदर स्त्रीने गर्भावस्तेच्या अगदी सुरूवातीच्या काळात जर सायकल चालवली तर चांगला व्यायम होतो. त्यामुळे प्रसुतीकाळात होणारा त्रास कमी होतो.
बुद्धी: नियमित सायकल चालवल्याने शरीराला व्यायम मिळतो पण, आपल्या विचारांनाही चालना मिळते. त्यामुळे मन आणि बुद्धी स्थिर राहते. विचारांच्या कक्षा रूंदावतात. बुद्धी वाढते असा दावा संशोधक करतात.
रोगप्रतिकारक क्षमता: सायकल चालवल्याने शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम मिळतो. याचा फायदा आरोग्याला होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते.